Nashik News : शिवसृष्टी प्रकल्पाची कामे जलद गतीने पूर्ण करा; छगन भुजबळांच्या सूचना
Yeola News : शिवसृष्टी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत साकारण्यासाठी त्याच्या कामांना प्राधान्य देवून गतीने कामे पूर्ण करावी, अशा सूचना छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
Chhagan Bhujbal नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारा शिवसृष्टी प्रकल्प (Shivsrushti Project) अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत साकारण्यासाठी त्याच्या कामांना प्राधान्य देवून गतीने कामे पूर्ण करावी, अशा सूचना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिल्या आहेत.
येवला (Yeola) येथे पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. त्यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, आर्किटेक्चर सारंग पाटील यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते.
पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी नियोजन करा
छगन भुजबळ म्हणाले की, शिवसृष्टी प्रकल्प बांधकाम करताना व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखील याठिकाणी पाण्याची कमतरता भासणार नाही, याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. प्रकल्पाची कामे वेळेत करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी करून कामांना वेग देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
अशी आहेत शिवसृष्टी प्रकल्पातील प्रस्तावित कामे
शिवसृष्टी प्रकल्पासाठी साधारण अकरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 10 फूट उंचीचा सिंहासनाधिष्टित मेघडंबरीसह पुतळा उभारला जाणार आहे. महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना व महाराजांचे सेनापती यांचे भित्तीचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शन केले जाईल. माहिती केंद्र व कार्यालय, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, ऑडिओ व्हिज्युअल हॉल, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, स्वच्छतागृह, उपहार गृह, गार्डन व वाहनतळ अशी प्रस्तावित कामे होणार आहेत.
नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या - छगन भुजबळ
येवला उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या सी. टी. स्कॅन मशीनचे लोकार्पण मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही गरजू व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना छगन भुजबळ यांनी दिल्या. आज लोकार्पण करण्यात आलेल्या साधारण साडेचार कोटींच्या सी. टी. स्कॅन मशीनमुळे अनेक दुर्धर आजारांचे निदान होण्यास मदत होणार आहे. अतिगंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यकता भासल्यास खाजगी विशेष तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
शरद पवारांच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर; म्हणाले, "सुप्रीम कोर्टात जातायेत ना, तर जा..."