एक्स्प्लोर

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल, कुठले रस्ते बंद, कुठले सुरु? जाणून घ्या

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाशिकच्या अनेक मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजेपासून मध्यरात्री बारापर्यंत हे बदल लागू असतील.

Nashik News नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2024) शहरात भद्रकाली परिसरातून मुख्य मिरवणुकीसह पाथर्डी फाटा, पंचवटी आणि नाशिकरोडला भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने गर्दी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक मार्गांत बदल (Traffic Diversion In Nashik) करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.19) दुपारी बारा वाजेपासून मध्यरात्री बारापर्यंत हे बदल लागू असतील आणि महत्त्वाच्या ठिकाणी बॅरकेडिंग करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

नाशिकरोड (Nashikroad) परिसरात (22 फेब्रुवारीपर्यंत) छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिकरोड आणि जेलरोड या दोन ठिकाणी शिवजयंती उत्सव होणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी मिरवणूक, 20 ते 22 फेब्रुवारी सायंकाळी 7 ते साडेदहा वाजेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी हे पर्यायी मार्ग

यामुळे बिटको चौक व सिन्नरफाटासह रेल्वे स्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालून जाणारी वाहतूक बंद असेल. बिटको चौकातून जेलरोडमार्गे व नांदूरनाकाकडून बिटको चौकाकडे दोन्ही बाजूची वाहतूक बंद असेल. रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी दत्त मंदिर सिग्नल, सुराणा हॉस्पिटल, आनंदनगर टी पॉइंट, सत्कार टी पॉइंट, रिपोर्ट कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशनवर पर्यायी रस्त्याने जाता येईल.

तसेच सुभाष रोडमार्गे परतीची वाहतूक नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या सिटी लिंक बसेस नाशिकरोड जुने न्यायालयासमोरून आर्टिलरी रोडमार्गे जयभवानी चौकातून उपनगर सिग्रलमार्गे जातील. पुणे-नाशिक सर्व प्रकारची वाहतूक दत्त मंदिर चौकातून उड्डाणपुलावरुन सिन्नर फाट्याकडे जातील व येतील. बिटको चौकातून जेलरोडमार्गे नांदूर नाक्याकडे जाणारी वाहतूक इंगळे नगर येथून कॅनल रोड ते हरीविहार नगरमार्गे टाकळीकडे जातील. दूर नाक्याकडून बिटको चौकात येणारी वाहतूक दसक पुलावरुन एकेरी मार्गावर सुरू असेल.

मुख्य मिरवणूक (वाकडी बारव) बंद मार्ग

वाकडी बारव -महात्मा फुले मंडई-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा मेनरोड-धुमाळ पॉइंट-सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-रविवार कारंजा-मालेगाव स्टैंड- पंचवटी कारंजामार्गे मालवीय चौकातून रामकुंडापर्यंत.

हे आहेत पर्यायी मार्ग

निमाणी व पंचवटी कारंजापासूनच्या सिटीलिंक बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. रविवार कारंजा व अशोतस्तंभमार्गे जाणाऱ्या सिटीलिंक बसेस शालीमारवरुन सुटतील. सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे नाशिकरोड व शहरात इतरत्र जातील.

पंचवटी परिसर बंद मार्ग

मालेगाव स्टँड-इंद्रकुंड-पंचवटी कारंजा दिंडोरी नाका- मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टँडकडे दोन्ही मार्ग. 

पंचवटी परिसर पर्यायी मार्ग

दिंडोरी नाका-पेठ नाका मखमलाबाद नाका-रामवाडी पूलमार्गे इतरत्र- मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पूलमार्गे इतरत्र - ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणारी वाहतूक आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे इतरत्र. 

अंबड परिसर बंद मार्ग

बोधलेनगर सिग्नल, कलानगर, पाथर्डी फाटा, पाथर्डी सिग्नल ते गरवारे दोन्ही बाजूंनी अवजड वाहतूक बंद-पाथर्डी गाव ते शिवाजी पुतळ्यासमोरुन अंबड- सातपूर मार्गावरील अवजड वाहतूक बंद.

अंबड परिसर पर्यायी मार्ग

गरवारे पॉइंट येथील उड्डाणपुलावरुन द्वारकाकडे. बोधले नगर सिग्नलवरुन द्वारकापर्यंत व तेथून उड्डाणपूलावरुन गरवारे पॉइंटकडे- पाथर्डी गाव, सिग्नलमार्गे सातपूरकडे जाणारी वाहतूक पांडवलेणीसमोरील बोगद्यातून अंबड एमआयडीसीमार्गे वाहने जातील.

आणखी वाचा 

Nashik News : शिवसृष्टी प्रकल्पाची कामे जलद गतीने पूर्ण करा; छगन भुजबळांच्या सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget