Nashik Crime : नाशिकमध्ये पुष्पा पुन्हा सक्रिय, दुसऱ्यांदा विभागीय आयुक्तांच्या बंगल्यात चंदन चोरी
Nashik Crime : नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या बंगल्यात दुसऱ्यांदा चंदन चोरी झाली आहे.
Nashik Crime : गेल्या काही महिन्यात नाशिकमध्ये (Nashik) चंदन चोरीच्या घटनांना (Theft) आळा बसला होता. मात्र पुन्हा एकदा चंदन चोरांनी डोके वर काढले असून नाशिकच्या विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrushna Game) यांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये गुन्हेगारी (Crime) थांबायचं नाव घेत नसताना चंदन चोरी प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय वसतिगृह परिसरात असलेल्या विभागीय आयुक्तांच्या बंगल्याचा आवारात चोरांनी प्रवेश करुन झाड चोरी केली आहे. विशेष म्हणजे विभागीय आयुक्तांच्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांच्या पहाऱ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. चांडक सर्कल येथे विभागीय आयुक्त यांचे राजगृह नावाचे शासकीय निवासस्थान आहे. या बंगल्याच्या आवारात चंदनाचे झाडे आहेत. रात्रीच्या वेळी छंद चोरांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश करत चंदनाचे झाड कापून झाडाचा ओंडका चोरी केला. झाड तोडून त्याच्या पालापाचोळा त्या ठिकाणी टाकून पळ काढला.
दरम्यान यापूर्वी देखील नाशिकच्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर आता नाशिकचे महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. एवढ्या पोलीस बंदोबस्तातही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बंगल्याच्या आत प्रवेश करून चंदनाच्या झाडाच खोड चोरांनी लंपास केले आहे. पोलीस सुरक्षा असताना देखील पुन्हा चंदनाच्या झाडाचे खोड चोरून नेल्याने येथील सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरात पहाणी केली असता गोल्फ कल्ब मैदानाच्या रस्त्याच्या कडेला बंगल्याच्या भींतीवरुन उडी मारुन बंगल्याच्या आवारात प्रवेश करत चंदनाचे झाड चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
चोरांकडून शासकीय निवासस्थाने लक्ष्य
दरम्यान नाशिकच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून अनेकदा चंदन चोरीचे पारकर उघडकीस आले आहेत. तसेच विभागीय आयुक्त बंगल्याच्या आवारातून तीन ते चार महिन्यापुर्वी चंदनाचे झाड चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसल्याने दुसऱ्यांदा चंदनाचे झाड चोरी झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय पोलीस अधिक्षक यांच्याही बंगल्यातून यापूर्वी चोरी झाली होती. त्यामुळे थेट शासकीय अधिकाऱ्यांनाच नाशिकचा पुष्पा लक्ष्य करीत असल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.