(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : मनमाडला फुकट्या प्रवाशांवर 40 लाखांची दंडात्मक कारवाई, सहा हजार जणांचा विना तिकीट प्रवास
Nashik News : मनमाड रेल्वे प्रशासनाकडून (Manmad Railway) एकदिवशीय शिबीर राबविण्यात आले. यामध्ये जवळपास 40 लाखांचा दंड विदाउट तिकीट प्रवास (Without Ticket) करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) मनमाड हे रेल्वेचे जंक्शन (Manmad Railway Station) म्हणून ओळखले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona crisis) पूर्ण क्षमतेने रेल्वेगाड्या सुरु झाल्यानंतर प्रवासी संख्याही वाढली आहे. अशातच विना तिकिट प्रवासी देखील वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे प्रशासनाकडून एकदिवशीय शिबीर राबविण्यात आले. यामध्ये जवळपास 40 लाखांचा दंड विदाउट तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशी वाहतूक बंद असल्याने रेल्वे गाड्या बंद होत्या. परिणामी रेल्वेची वाहतूकही ठप्प होती. मात्र आता जवळपास सर्वच रेल्वे गाड्या धावू लागल्याने रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्ये फुकट या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल आखडून धावत्या रेल्वेगाडीतून आणि रेल्वे स्थानकातील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात लाईन स्कोर द्वारे भुसावळ विभागाने 5900 विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल 40 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तर भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 298 प्रवाशांकडून एक लाख 81 हजार 260 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सदरची मोहीम राबविल्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे. रेल्वेचा महसूल बनवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन तिकीट तपासणी मोहीम राबवत असते. मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकावर आणि प्रवासी रेल्वे गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांना विरुद्ध एक दिवसीय तपासणी मोहीम राबवण्यात आली. भुसावळ विभागातील नाशिक-मनमाड, भुसावळ-खंडोबा आणि बडनेरा रेल्वे स्थानक आणि खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ चाळीसगाव- धुळे- जलंब ते खामगाव धावत्या गाडीत एक दिवशीय तपासणी मोहीम राबविण्यात आली.
मध्य रेलचे विभागातील वाणिज्य विभागातील 180 आणि रेल्वे सुरक्षा बलाचे 160 कर्मचारी सहभागी आहेत. सहभागी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पथक तयार करून मध्य रेल्वे विभागात धावणारे जवळपास हे 40 हून अधिक प्रवासी रेल्वे गाड्या एक दिवस तपासणी द्वारे करण्यात आल्या. भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक एस एस टी डी आय यांच्या अध्यक्षतेखाली व भुसावळ विभागाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक शिवराज मानस पुरे यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळ वनविभाग व रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली.
विना तिकीट प्रवाशांना बसणार चाप
मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी विविध भागात येणाऱ्या येणाऱ्या गाड्यांमधून तसेच रेल्वे स्थानकावर थांबला असता उतरणाऱ्या प्रवाशांवर रेल्वेस्थानकावर अचानक गाठ पडल्यावर विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणले होते. रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसला आहे. तर अशा पद्धतीने मोहीम राबविल्याने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप बसणार आहे.