(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Onion Issue : कांदा उत्पादक पुन्हा रस्त्यावर, मालेगावी 'कांदा बाजार सत्याग्रह' तिरडी आंदोलन
Nashik Onion Issue : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादक भाव (Onnion Rate) घसरल्याने शेतकरी संघटनेतर्फे मालेगावी (Malegaon) सत्याग्रह तिरडी आंदोलन करण्यात आले.
Nashik Onion Issue : राज्यातील प्रामुख्याने नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादक भाव (Onnion Rate) घसरल्याने व केंद्राच्या निर्यात, व्यापारविषयक धरसोडीच्या धोरणामुळे संकटात आले आहेत. कांदा प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व उत्पादकांच्या(Onion Producers) न्याय्य मागण्यांसाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे हुतात्मा चौकात शेतकरी संघटनेतर्फे ‘कांदा बाजार (Onion Market) स्वातंत्र्य अर्थाग्रह’ या ब्रीद वाक्याने सत्याग्रह तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर कांदा फेकत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
राज्यात नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे निफाड येथे कांद्याची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी असताना कांदा उत्पादकांना योग्य मोबदला नसल्याने वारंवार आंदोलन केली जात आहेत. सातत्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण आणि केंद्राच्या निर्यात विषयक धरसोडीच्या धोरणावरून शेतकरी संकटात सापडला आहे. याच मुद्द्यावरून शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली असून कांद्याच्या दराबाबत योग्य धोरण ठरवा अशी मागणी केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा धागा पकडत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. 'कांदा बाजार स्वातंत्र्य सत्याग्रह' आंदोलनाची हाक देत हटके स्टाईल आंदोलन केले आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्याच्या माळा बनवून गळ्यात घालून प्रतिकात्मक तिरडी खांद्यावर घेतली होती.
शेतकरी संघटनेने केलेल्या या आंदोलनात मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यातील कांद्याचे दर घसरत असल्याने अधिकचे कांद्याचे उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात घेतले जात असून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ नाशिक जिल्ह्यात आहे. केंद्राच्या निर्यात व्यापार विषयक धरसोडीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायद्या ऐवजी नेहमी नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांत कांदा भावात प्रचंड घसरण झाली असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.
सातत्याने कांद्याच्या भावात घसरण आणि मुसळधार पावसाने झालेले नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडला असून मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. याच विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने कांदा प्रश्नावरून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तिरडी आंदोलन केले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे हुतात्मा चौकात शेतकरी संघटनेतर्फे कांदा बाजार स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनामुळे काही काळ मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांत कांदा भावात प्रचंड घसरण झाली असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. त्यामुळे सरकारने कांदा प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कांदा उत्पादकांच्या मागण्या
गेल्या वेळी निर्यातबंदी कराराचा भंग झाल्याने परदेशातील सौदे पूर्ण न झाल्याने देशाची आंतरराष्ट्रीय बाजारात पत राहिली नाही. त्याचा फटका बसल्याने या दोन वर्षांच्या काळातील कांदा उत्पादकांच्या कर्जाची सरकारने फेड करावी. सरकारने कांदा व्यापारात हस्तक्षेप करू नये, कांदा कायमस्वरूपी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावा. भावस्थिरीकरण निधी योजना रद्द करावी. युद्धजन्य परिस्थिती वगळता कांदा व निर्यातक्षम सर्व शेतीमालाची निर्यात कायमस्वरूपी खुली असावी. आयात-निर्यात धोरण देशाअंतर्गत उपलब्धतेच्या आधाराने ठरवू नये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खरेदी-विक्री करार पूर्णत्वास न्यावे.