(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News : अहमदनगर पोलिसांच मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात, औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका
Ahmednagar News : अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आलेले मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
Ahmednagar News : अहमदनगर पोलिसांकडून (Ahmednagar) करण्यात आलेले मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात सापडले असून मॉकड्रिलच्या (Mockdrill) दरम्यान मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवला जात असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी गृह मंत्रालयासह पोलीस महासंचालक आणि इतर प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याच्या आदेश दिल्याची माहिती तक्रारदाराकडून प्रसिद्धी पत्रकातून दिली जाते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अहमदनगर पोलिसांच्या वतीने जुन्या बस स्थानकावरती एक मॉकड्रिल करण्यात आलेलं होतं. या मॉकड्रिलच्या दरम्यान जो डमी आतंकवादी दाखवण्यात आलेला होता. त्यांने अल्लाहू अकबरचे नारे दिले होते. त्यांनतर हा वाद सुरू झाला आहे. सय्यद ओसामा अब्दुल कदरी मौलाना यांनी या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठामध्ये (Aurangabad Khandpith) एक जनहित याचिका दाखल केलेली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की अशा पद्धतीने नारे देऊन आतंकवाद्यांचा धर्म जो आहे तर तो मुस्लिमच असतो, असं दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलेला होता.
त्यानंतर हा वाद पुढे वाढत गेल्याचे दिसून आले. या संदर्भामध्ये न्यायालयाकडून गृहमंत्रालय, पोलीस महासंचालक किंवा इतर जे प्रतिवादी आहेत तर त्यांना नोटीस बजावण्यात यावी अशी माहिती सय्यद ओसामा अब्दुल कदर मौलाना यांच्या वकिलांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे. या नोटीसीमध्ये विशेष समुदायातील व्यक्तीला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर पुढील तारखेपर्यंत प्रतिबंध घालण्याचे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती या प्रसिद्ध पत्रकातून देण्यात आलेली आहे.
मात्र अहमदनगरसह नागपूर (Nagpur) शहरात देखील अशा पद्धतीने मॉकड्रिल करण्यात आले होते. त्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये अशा पद्धतीने एखाद्या विशिष्ट समुदायातील व्यक्तीला दहशतवादी दाखवण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. पोलिसांकडून देखील अशा पद्धतीने होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकरणावरून कुठेतरी आता चर्चा रंगताना दिसत आहेत.
औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल
पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एक मॉकड्रिल राबवलेलं होतं. परंतु या मॉकड्रिलवर आता आक्षेप घेतला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मुस्लिम द्वेष पसरवला गेला, अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. याप्रकरणी आता गृहमंत्रालयासह पोलीस महासंचालक आणि इतर प्रतिवादी यांनाही नोटिसा बजावल्या जाव्यात असे आदेश दिले गेल्याची माहिती तक्रारदाराने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या मॉकड्रिल दरम्यान ज्या दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याचं दाखवलं गेलं. तो अतिरेकी मुस्लिम दाखवला गेला. कारण त्यांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या होत्या. यावर मुस्लिम समाजाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.