एक्स्प्लोर

Nashik Budhha Paurnima : पाच फुटांच्या शंभर बुद्ध मूर्ती, शंभर रथातून मिरवणूक; नाशिकमधील शंभर गावांना बुद्धमूर्तीचं दान 

Nashik Budhha Paurnima : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शंभर गावांना बुद्ध पौर्णिमेनिमीत्त पाच फूट उंचीच्या शंभर बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या आहेत.

Nashik Budhha Paurnima : बुद्ध पौर्णिमेनिमीत्त (Budhha Paurnima) पाच फूट उंचीच्या फायबर मेटलपासून बनविलेल्या शंभर बुद्ध मूर्तीची (Budhha Murti), शंभर भव्य रथांतून मिरवणूक काढण्यात आली. या शंभर बुद्ध मूर्ती नाशिक जिल्ह्यातील (Nashik) शंभर गावांना दान करण्यात आल्या. नाशिकमध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून हा बुद्ध मूर्ती प्रदान सोहळा पार पाडण्यात आला. 

दोन दिवसांवर बुद्ध पौर्णिमा आली असून शहरात उत्सवात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून नाशिक (Nashik) शहरातून हजारो बांधवांसह बुद्धमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शंभर गावांमधील 500 श्रामनेर आणि हजारो नागरिक सहभाग झाले होते. सम्राट अशोक जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध पौर्णिमा निमित्त 23 एप्रिल ते दोन मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामनेर शिबीर घेण्यात आले. या शिबीरांत शंभर गावातील प्रत्येकी पाच उपासक श्रामनेर झाल्यास सुमारे 500 श्रामणेरांचे प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

दरम्यान बुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील शंभर गावांना शंभर बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या. प्रत्येकी साडेपाच फूट उंचीच्या तसेच फायबर मेटल पासून एकाच साच्यात तयार करण्यात आलेल्या या बुद्धमूर्तींना गावागावांत दान करण्यात आले. रंगबिरंगी फुलांनी व निळा झेंड्यांनी सजवलेल्या शंभर रथांमधून या मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल क्लब येथे शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर आयोजित महाबौद्ध धम्म परिषदेत भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग यांनी मार्गदर्शन करण्यात आले. तर सायंकाळी सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा बौद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. 

शंभर गावांत श्रामणेर शिबीर 

दरम्यान भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बीएमए ग्रुपच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये श्रामणेर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात प्रत्येक गावातील पाच उपासकांनी श्रामणेर शिबीरात सहभाग घेतला. त्यानुसार यंदा जिल्ह्यातून एकूण पाचशेहून अधिक उपासक श्रामणेर झाले. याच शंभर गावांना बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या. या साडे पाच फूट उंचीच्या मूर्ती त्या प्रत्येक गावातील बुद्ध विहारात दान करण्यात आल्या. तत्पूर्वी नाशिक शहरातील   विविध भागातील भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
Nashik Crime News: पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना
पोलीस असल्याचं सांगत व्यापाऱ्याचं अपहरण, 25 लाखांची मागितली खंडणी; छळादरम्यान व्यापाऱ्याने सोडला जीव, नाशिकमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget