एक्स्प्लोर

Nashik Delhi Air Service : नाशिककरांची दिल्ली स्वारी, पहिल्याच दिवशी 163 प्रवाशांचा हवाई प्रवास 

Nashik Delhi Air Service : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे बंद असलेली नाशिक दिल्ली विमानसेवा (Nashik Delhi air Service) सुरू झाली असून पहिल्याच दिवशी दिडशेच्यावर प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे.

Nashik Delhi Air Service : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे बंद असलेली नाशिक -दिल्ली विमानसेवा (Nashik delhi air Service) सुरू झाली असून पहिल्याच दिवशी दिडशेच्यावर प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. त्याचबरोबर प्रवाशांसह व्यापारी, उद्योजकांनी देखील दिल्ली दौरा केला आहे. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्ली-नाशिक- दिल्ली विमानसेवा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार काल सकाळी नाशिकहून (Nashik) दिल्लीसाठी जेट विमानसेवेने उड्डाण घेतले. जवळपास 180 आसनी असलेल्या विमानसेवेच्या पहिल्याच दिवशीच्या दोन फेऱ्यांत 163 प्रवाशांनी हवाई सफरीचा आनंद घेतला.

नाशिक (ओझर) विमानतळ (Ozar Airport) येथून नाशिक-हैद्राबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक- पाँडेचरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा स्पाइस जेट या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दि.04 रोजी नाशिकहून दिल्लीसाठी पहिले उड्डाण भरले. 

तर जेट कंपनीच्या माध्यमातून अहमदाबादमार्गे दिल्ली अशी हॉपिंग फ्लाइटही सुरू आहे. यामुळे आता दिल्लीकरीता नाशिकरांना शनिवार वगळता रोज विमानसेवा होती. मात्र चार ते नऊ ऑगस्टपर्यंत नियोजनानुसार सकाळची वेळ मिळाल्याने नाशिककरांना दिवसभरात दिल्लीत कामे उरकणे शक्य होणार आहे. काल दिल्लीहुन नाशिक ला येणार्‍या 91 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. तर नाशिकहून दिल्लीला 72 प्रवाशांनी सफर केली. 

वेळापत्रकात बदल
दरम्यान 10 ऑगस्टपासून वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, ही वेळ आणखी सव्वा तास लवकर होणार आहे. नव्या वेळापत्रकामुळे सकाळी 10.45 वाजताच दिल्लीत पोहचणार असुन किमान 5 हजार 100 रुपयांपासून तिकीट बुकिंग असणार आहे. सध्याच्या वेळापत्रकानुार दिल्लीहून सकाळी 7.56 वा. टेकऑफ नाशिकला सकाळी 9.45 वाजता लँडिंग तर परतीच्या प्रवासात नाशिकहून सकाळी 10.15 वा. टेकऑफ करणार आहे. दिल्लीत दुपारी 12.15 वाजता लँडिंग होणार आहे. ही वेळ कार्यालयीन कामासाठी सोयीची करण्याच्या दृष्टीने दि.10 ऑगस्टपासून या विमान सेवेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार  दिल्लीहून स. 6.35 वाजता टेकऑफ घेऊन  नाशिकला स. 8.30 वाजता लँडिंग होईल त्यानंतर  नाशिकहून स. 9.00 वाजता टेकऑफ घेऊन दिल्लीत स. 10.45 वाजता लँडिंग करण्यात येणार असल्याचे मनिष रावल यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vinayak Raut vs Nilesh Rane : निलेश राणेंचं विनायक राऊतांना प्रत्त्युत्तरLoksabha Election Voting Nagpur : प्रत्येक मतदान केंद्रावर माॅक पोलJalgaon : जळगावात वंचितच्या उमेदवाराचा माघारीचा निर्णयChitra Wagh on Raut statement:जनता थोबाडात दिल्याशिवाय राहणार नाही,चित्रा वाघ यांनी राऊतांना सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
Embed widget