(Source: Poll of Polls)
Nashik Crime : खासगी कंपनीत गुंतवणूक करताय? सावधान! नाशिकमध्ये तब्बल 01 कोटी 17 लाखांची फसवणूक
Nashik Crime : खाजगी कंपनीत (Company) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पैशांचा अपहार करून एक कोटी 17 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik) घडला आहे.
Nashik Crime : खाजगी कंपनीत गुंतवणूक करण महिलेसह इतरांना चांगलंच महागात पडलं असून गुंतवणूकदारांच्या पैशांचा अपहार करून सुमारे एक कोटी 17 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik) घडला आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस (Mumbai Naka Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Mobile) असल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणातून अनेक जणांना फसवणुकीच्या घटनांना सामोरे जावे लागते. अनेकदा एखादी लिंक वर क्लिक केल्यावर, इन्स्टंट लोन (Instant Loan) देण्याच्या बहाण्यावर, तर मोबाईलवर आलेल्या ओटीपीवर यामुळे सायबर क्राईम (Cyber Crime) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर काही कंपन्या पैसे गुंतविण्याच्या नावावर अनेक जणांना गंडा घलून फरार झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशीच घटना समोर आली आहे.
नाशिक येथे वास्तव्य करणाऱ्या योगिता घनश्याम बैरागी या महिलेने मुंबई नाका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे मुंबई नाक्यावरील किनारा हॉटेल समोरील माधव प्लाझा येथे कलकाम रियल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात संशयित नाशिक जिल्ह्यातील विभागीय कार्यालयातील अशोक बागुल, कंपनीचे चेअरमन विष्णू पांडुरंग दळवी, सहकारी संचालक विजय सुपेकर, सुनील वांद्रे, तुषार सोनार, देवानंद शर्मा, संतोष थोराते, संदेश पडियार व इतर प्रमोटर यांनी संगणमत करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादींसोबत इतरही नागरिकांची फसवणूक या कंपनीच्या माध्यमातून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान संबंधित संशयितांनी फिर्यादी योगिता बैरागी व इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांना कलकाम रियल इन्फा कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी बैरागी व इतरांनी या कंपनीत एक जानेवारी 2013 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत सुमारे एक कोटी 17 लाख 29 हजार 553 रुपयांची गुंतवणूक केली. मात्र हे गुंतवणूक करून बैरागी व इतर गुंतवणूकदारांना त्यांचा मोबदला मिळाला नाही. याबाबत गुंतवणूक दारांना कुणकुण लागली.
त्याबाबत गुंतवणूकदारांनी पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र कंपनीचे चेअरमन व संचालक यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली कंपनीच्या संचालकांनी बैरागी व इतर गुंतवणूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक करून गुंतवणूकदारांच्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून सुमारे एक कोटी 17 लाख रुपयांचा आभार केला तसेच विश्वातघात करून आर्थिक फसवणूक केल्याची बाब फिर्यादी बैरागी व इतर गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कल काम कंपनीच्या चेअरमन सहित इतर आठ संशयितांविरुद्ध विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून पुढील तपास सायकल पोलीस निरीक्षक गेंगजे करीत आहेत.