Hemant Godse on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
Hemant Godse on Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीतून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. यावर खासदार हेमंत गोडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Hemant Godse on Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti) तिढा निर्माण झाला होता. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार जाहीर होऊन तीन आठवडे झाले. तरीदेखील महायुतीत मात्र नाशिकचा उमेदवार ठरत नव्हता.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून देखील नाशिकच्या जागेसाठी जोर लावला जात होता मात्र महायुतीत जागावाटप अजूनही ठरत नसल्याचे आज त्यांनी अखेर या निवडणुकीतून मी माघार घेत आहे, अशी घोषणा केली.
भुजबळांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला
भुजबळांच्या घोषणेनंतर खासदार हेमंत गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अमित शाह (Amit Shah) यांनी नाव सुचवले, असे भुजबळ म्हणाले. पण एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहे. गेल्या दहा वर्षांपासून मी या मतदारसंघात अनेक कामे केली आहेत. आपला ठरत नसल्याने आणि वेळ कमी असल्याने भुजबळांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे.
भुजबळांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला
आज किंवा उद्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) जागेबाबत घोषणा होईल. ही जागा शिवसेनेकडेच (Shiv Sena) राहणार आहे. महायुतीतील सर्व घटक सोबत काम करतील, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार मागील तीन आठवड्यापासून फिरत आहेत. त्यांचा प्रचारदेखील पुढे गेला आहे. नाशिकच्या जागेचा निर्णय घ्यायला जितका वेळ लागेल तितक्या अडचणी वाढणार आहेत. सध्या जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतली. मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी राज्यभरात प्रचाराला सुरूवात केली आहे. मी आता महायुतीची (Mahayuti) शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकली राज ठाकरेंची छबी, मनसे आणि गोडसेंचं 'असं' आहे विशेष नातं