एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: अजितदादा म्हणाले, अमित शाहांनी नाशिकमधून तुम्हाला लढायला सांगितलंय; आश्चर्यचकित झालेल्या भुजबळांचा फडणवीसांना फोन

Maharashtra Politics: छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार. मी वरिष्ठांवर नाराजी दाखवलेली नाही. पण जेव्हा कोणाचं आग्रह असेल तर कोणी थांबलं पाहिजे. अमित शाह म्हणाले की, नाशिकमध्ये समीर भुजबळ नव्हे तर छगन भुजबळ उभे राहतील.

मुंबई : नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीचा उमेदवार कोण असणार, याचा सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. या जागेसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र,भाजपने या जागेवरुन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला होता. परंतु, आता छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेसाठी आपले नाव अमित शाह (Amit Shah) यांनीच कशाप्रकारे सुचवले, याचा घटनाक्रम उपस्थितांसमोर मांडला.

छगन भुजबळ यांनी सविस्तरपणे नाशिक लोकसभेची ऑफर आपल्याला कशाप्रकारे देण्यात आली, हे सांगितले. त्यांनी म्हटले की, होळीच्या दिवशी मला अजितदादांचा निरोप आला म्हणून मी देवगिरी बंगल्यावर गेलो होतो. तिथे अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल बसले होते. एक वाजता मला देवगिरी बंगल्यावर बोलावण्यात आले होते. आम्हाला नाशिकला जायचं होतं, पण अजितदादांनी बोलावल्याने मी तिकडे गेलो. बंगल्यावर गेल्यानंतर मी अजित पवार यांना विचारलं मला कशासाठी बोलावलं? तेव्हा अजित पवार  म्हणाले की, आम्ही नुकतेच दिल्लीवरुन परत आलो आहोत. त्याठिकाणी आमची अमित शाह यांच्याशी लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी नाशिक लोकसभेचा विषय आला. तेव्हा आम्ही सांगितले की, नाशिकमध्ये आमचे आमदार आहेत, ती जागा आम्हाला द्या. त्यावर अमित शाह यांनी विचारले की, तुमचा उमेदवार कोण आहे? तेव्हा आम्ही समीर भुजबळ यांचे नाव सांगितले. मात्र,अमित शाह म्हणाले की, नाशिकमध्ये समीर भुजबळ नव्हे तर छगन भुजबळ उभे राहतील. 

यावर मी बोललो की, पण मी लोकसभेची उमेदवारी मागितलीच नव्हती. त्यावर अजितदादा म्हणाले की, अमित शाह यांनी नाशिकच्या जागेवरुन छगन भुजबळ लढतील, असे सांगितले आहे. आम्ही त्यांना सांगितले की, त्याठिकाणी शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत. त्यावर अमित शाह म्हणाले की, त्यांना आम्ही समजवू. हे सगळे ऐकून घेतल्यानंतर मी अजित पवार यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागून घेतला. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा अजितदादांना भेटायला गेलो. मी पुन्हा अजित पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, तुम्हालाच लढावं लागेल. त्यानंतर आम्ही नाशिकला गेलो आणि चाचपणी सुरु केली. सुदैवाने मला चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिकमधील मराठा, ब्राह्णण, दलित आणि आदिवसारी समाज मला पाठिंबा द्यायला तयार होता, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. 


भुजबळांना अजितदादांच्या सांगण्यावर विश्वास बसेना म्हणून फडणवीसांना फोन केला

अमित शाह यांनी तुम्हाला नाशिक लोकसभेच्या जागेवरुन लढण्यास सांगितले आहे, या अजितदादांच्या सांगण्यावर छगन भुजबळ यांना विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंना फोन केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मी फडणवीसांना फोन केला आणि दिल्लीत काय घडले, याबाबत विचारले. तेव्हा फडणवीसही म्हणाले की, अमित शाह यांनी तुम्हालाच नाशिकमधून लढायला सांगितले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मीदेखील त्या बैठकीत होतो. अमित शाह यांनी नाशिकच्या जागेसाठी तुमच्याच नावाचा आग्रह धरला, असे भुजबळांनी सांगितले.

आणखी बातम्या

'नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून मी माघार घेतोय' महायुतीच्या वादात छगन भुजबळांची मोठी घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget