एक्स्प्लोर

पनीर खरेदी करताना सावधान! 'एफडीए'कडून तब्बल 314 किलो बनावट पनीर जप्त, नाशिकमध्ये मोठी कारवाई

Nashik News : नाशिक अन्न औषध विभाग प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सिन्नरच्या मुसळगाव एमआयडीसीमध्ये धाड टाकून तब्बल 314 किलो बनावट पनीर साठा नष्ट करण्यात आला आहे.

Nashik FDA Action नाशिक : सिन्नर (Sinnar) येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील (Musalgaon MIDC) दुध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे. यशवी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टस (Yashvi Milk and Milk Products), मुसळगाव एमआयडीसी, या कंपनीत गुरुवारी सायंकाळी धाड टाकून 314 किलो भेसळयुक्त पनीरसह (Fake Paneer) भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा साठा जप्त केला.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात अन्न, औषध प्रशासनाकडून (Food and Drug Administration) कठोर कारवाई करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड (Raid) टाकली असता त्याठिकाणी भेसळयुक्त पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले. 

314 किलो बनावट पनीर जप्त

त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायदयांतर्गत सखोल तपासणी केली असता त्याठिकाणी पनीर बनवितांना रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळल्याने सुवर्णा महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित 53 हजार 380 रुपये किंमतीचा 314 किलो पनीरचा साठा जप्त केला. तसेच पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा नमुने घेवून जप्त केला आहे. भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच मानवी सेवनास जावू नये, याकरीता नष्ट करण्यात आले. 

'यांनी' केली कारवाई 

ही कारवाई सहआयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) उदयदत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, योगेश देशमुख, नमुना सहायक विकास विसपुते, वाहनचालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Dengue Update : नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात 365 जणांना डेंग्यूचा डंख, दहा दिवसातील आकडेवारीने चिंता वाढवली

Nashik Hit & Run : नाशिक हिट अँड रन प्रकरणी गुजरातमधून दोघांना बेड्या, मद्य तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस येणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special ReportUddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special ReportMumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्तDevendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Embed widget