'नाशिक विकासासाठी दत्तक घेतलं, कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहराचा चेहरा बदलण्याची मोठी संधी': देवेंद्र फडणवीस
Nashik News : नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) व त्र्यंबकेश्वरचा (Trimbakeshwar) विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
मेळा बसस्थानकाच्या उद्घाटनाप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड राहुल ढिकले उपस्थित होते.
आधुनिक शहर म्हणून नाशिकची ओळख
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतले असल्याने येणाऱ्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नाशिक शहर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी असून स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या ज्वाजल्य विचारांची भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून एक आधुनिक शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले.
निओ मेट्रोचा प्रस्ताव लवकरच केंद्राला सादर करणार
रिंगरोड हा शहराच्या विकासाचे केंद्र मानले जाते. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नियोजित असलेल्या रिंगरोड काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच नाशिक पुणे फास्ट रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासोबतच नाशिक शहरासाठी निओ मेट्रोचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. आधुनिक सुविधेने सज्ज असे मेळा बस स्थानकाचे लोकर्पण झाले आहे. या स्मार्ट बसस्थानकासाठी लवकरच स्मार्ट बस उपलब्ध होणार आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मेळा बसस्थानक पाहिल्यावर विमानतळाची अनुभूती
मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) म्हणाले की, मेळा बसस्थानक पाहिल्यावर बसस्थानक नाहीतर विमानतळावर आल्याची अनुभूती येते. आरोग्य विद्यापीठात मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय व्हावे, गंगापुर डॅम परिसरात कन्व्हेन्शन सेंटर, साहसी क्रीडा संकुल, कृषि टर्मिनल मार्केट, इगतपुरीला हिल्स स्टेशन, व्दारका ते नाशिक रोड रस्त्याचे चौपदरीकरणासह उड्डाणपुल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासोबत राज्याचा देखील विकास करण्यात यावा, अशी अपेक्षा मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली.
कुंभमेळ्याचा आराखडा लवकरच शासनास सादर करू
पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले, मेळा बसस्थानक बघितल्यावर एसटी परिवहन विभाग कात टाकत असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे येत्या 2027 मध्ये येणारा कुंभमेळ्याचा आराखडा लवकरच तयार करुन राज्य शासनास सादर करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
असे आहे राज्यातील पहिले वातानुकुलीत मेळा बसस्थानक
कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर बांधलेले नवीन मेळा बसस्थानकाच्या 1.73 हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बसस्थानकात 6033.22 चौरस मीटर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या बसस्थानकात 20 प्लॅटफॉर्म असून 4 प्लॅटफॉम हे वातानुकूलित आहेत. यासोबतच वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, महिला, पुरुष चालक, वाहकांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, उपहारगृह एस. टी. बँक, तळघरामध्ये प्रशस्त पार्किंग, स्थानक प्रमुख कक्ष, 8 वाणिज्य आस्थापना, पॉवर रूम, वाहनतळास ट्रिमिक्स काँक्रीट.
आणखी वाचा
उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शाहा संभाजीनगरच्या दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार