राज्य मंत्रिमंडळ पाकिस्तानी समर्थकांचे ; आशिष शेलारांचा महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप
पाकिस्तानमधून रसद घेऊन भारतावर हल्ला करणाऱ्या लोकांच्या समर्थकांचे हे मंत्रिमंडळ आहे. असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही. असा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
Ashish Shelar : "30 कोटींची जागा 20 लाख रूपयांना विकली असून विकणारे बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत, तर घेणारे राज्य सरकारचे मंत्री आहेत. पाकिस्तानमधून रसद घेऊन भारतावर हल्ला करणाऱ्या लोकांच्या समर्थकांचे हे मंत्रिमंडळ आहे. असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही. नाकर्ते आणि निष्ठूर लोकांचे हे मंत्रिमंडळ आहे, असा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
आशिष शेलार यांनी आज नाशिक येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. "बॉम्बस्फोट घडवले आणि आरडीएक्स ट्रान्सफोर्ट केले, त्या शहावली खान तत्यानें हसीना पारकरच्या हस्तकाच्या मदतीने जागा बळकावली आहे. ज्याच्यासोबत करार झाला आहे तो आजन्म तुरुंगात आहे, मग करारावर एवढ्या स्वाक्षऱ्या कशा झाल्या? जेलमधील माणूस बाहेर कसा आला? असे प्रश्न उपस्थित करत मंत्री स्वाक्षरी घेण्यासाठी जेलमध्ये गेले होते का? असा आरोप शेलार यांनी यावेळी केला.
"बॉम्बे एक्स्चेंज आणि मुंबई महापालिकाची रेकी करून बॉम्बस्फोटाने उडवून द्यायची होती, त्याच्याशी आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली आहे. मंत्री नवाब मलिक दाऊदच्या बहिणीशी सलगी करतात. स्वतःचा पैसा बॉम्बस्फोटासाठी वापरायला देतात, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. "शरद पवार म्हणतात की, एका धर्माचा दाऊदशी सबंध लावणं बरोबर नाही. परंतु, हिंदू आतंकवादाशी सबंध लावणे तुमच्या डोक्यातून जरुर निघाले. हिंदू आतंकवादाची कल्पना मांडणारे पहिले शरद पवार आहेत. आता दाऊदच्या व्यवहारात पकडले गेल्यावर समर्थन करायला पुढे येत आहेत, अशी टीका शरद पवार यांच्यावर केली.
आशिष शेलार म्हणाले, "याकूब मेमन हा बॉम्बस्फोटामधील आरोपीला असूहनही त्याला फाशी देऊं नका, त्याला जिवंत राहण्याचा अधिकार आहे, अशी मागणी करणारे मंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेसाठी काँग्रेसचे समर्थन हवे म्हणून शिवसेनेने सावरकरांचे हिंदुत्व सोडले आहे."
महत्वाच्या बातम्या
- 12 आमदारांना यापुढे विधानभवनात प्रवेश मिळावा, आशिष शेलार यांचं विधानभवन सचिवांना पत्र
- BJP MLA Suspension : ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
- Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात परतले, मुंबई विमानतळावर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडून स्वागत