एक्स्प्लोर

Nashik Accident: गाडीत क्षमता पाच जणांची, बसले आठजण! टायर फुटले अन् विशीतील पाच मित्रांनी गमावला जीव

सिन्नरच्या मोहदरी घाटात (Nashik Sinnar Mohadari ghat Accident) झालेल्या अपघातात 5 प्रवाशांची क्षमता असलेल्या स्विफ्ट कारमध्ये तब्बल 8 मित्र मैत्रिणी बसले होते.

Nashik Accident : सिन्नरच्या मोहदरी घाटात (Nashik Sinnar Mohadari ghat Accident) झालेल्या अपघातात 5 प्रवाशांची क्षमता असलेल्या स्विफ्ट कारमध्ये तब्बल 8 मित्र मैत्रिणी बसले होते. मोहदरी घाटातील टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात तब्बल पाच जणांना प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. नाशिक- सिन्नर मार्गावरील (Nashik Sinnar road) ब्लॅकस्पॉट म्हणून ओळख असलेल्या मोहदरी घाटात आज तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. सिन्नर जवळील मोहदरी घाटात स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून कार पलीकडच्या लेनवर जाऊन दोन वाहनांवर आदळली. यात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व राहणार नाशिकचे असून एका लग्न सोहळ्यानिमित्त संगमनेरला गेले होते. 

अपघाताची भीषणता इतकी होती की कारमधील 8 पैकी पाच जणांचा जागेवर मृत्यू झाला. मयतांमध्ये 3 मुली आणि 2 मुले समावेश आहे. सिन्नरच्या अपघातातील पाचही मृतांची ओळख पटली असून हे सर्व जण नाशिक शहरातीलच रहिवासी आहेत. यामध्ये हर्ष दीपक बोडके (वय 17 वर्षे), सायली अशोक पाटील (वय 17 वर्षे), मयुरी पाटील (वय 16 वर्षे), प्रतीक्षा घुले (वय 17 वर्षे), शुभम तायडे (वय 17 वर्षे) अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी अकरावी-बारावीमध्ये ते शिक्षण घेतात. 

कालच्या बस अपघातानंतर आज या घटनेनं हादरलं नाशिक

नाशिक- सिन्नर महामार्गावर काल दुपारच्या सुमारास बस अपघातात (Nashik Bus accident) दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच नाशिक सिन्नर रस्त्यावरील मोहदरी घाटात भयंकर अपघातात वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. नाशिकचे काही विद्यार्थी संगमनेर ला मित्राच्या लग्नसमारंभात गेले होते. तिकडून परतत असताना मोहदरी घाटात आल्यानंतर कारचे टायर फुटले. टायर फुटल्याने स्विफ्ट कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. दुसऱ्या लेनमधून प्रवास करणाऱ्या इनोव्हा आणि एका दुसऱ्या स्विफ्टला धडक दिली. अपघातानंतर टायर फुटलेल्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. 

 पाच प्रवाशी क्षमता असलेल्या या कारमध्ये तब्बल आठ जण

एकूणच पाच प्रवाशी क्षमता असलेल्या या कारमध्ये तब्बल आठ जण प्रवास करत होते. मोहदरी घाटात आल्यानंतर कार वेगात असल्याने टायर फुटले, अन भीषण अपघात झाला. विशेष म्हणजे हे सर्वजण 17 ते 19 वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा वाहनामधील प्रवाशी क्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही बातमी देखील वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget