एक्स्प्लोर

Nashik News : दिंडोरीच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग; अवकाळी - गारपीटीपासून बचाव, भुसेंकडूनही कौतुक

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याने यशस्वी प्रयोग केला असून अवकाळीपासून द्राक्षबाग वाचविण्यात त्यांना यश आले आहे. 

Nashik News : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे (Hailstorm) द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील (Nashik) द्राक्षांना मोठा फटका बसला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Farmers) आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र आता याच नुकसानीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चालू वर्षीपासून राज्य सरकार एक नवीन प्रयोग हाती घेणार आहे. दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या द्राक्ष बागेत क्रॉप कव्हरचा यशस्वी प्रयोग केला असून त्यामुळे अवकाळीपासून द्राक्षबाग वाचविण्यात त्यांना यश आले आहे. 

गेल्या आठवडाभरापासून नाशिक जिल्ह्याला (Nashik District) अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. विशेष म्हणजे शनिवारी तसेच रविवारी सायंकाळी दिंडोरी (Dindori) तालुक्यातील मोहाडी, कुरनोली, खेडगाव, खडकसुकेणे, जोपूळ हा द्राक्षांचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली असून यामुळे द्राक्षबागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. काढणीवर आलेल्या द्राक्षांना याचा मोठा फटका बसला आहे. द्राक्षमणी गळून पडले, खराब झाले तसेच त्यांना तडेही गेले आहेत. व्यापारी देखील हा माल खरेदी करणार नसल्याची भिती असल्याने द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील द्राक्ष उत्पादकच सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र एकीकडे ही परिस्थिती असतांनाच दुसरीकडे मात्र मोहाडी गावचेच प्रगतशील शेतकरी सुरेश कळमकर यांच्या द्राक्षांचे गारपीट आणि वादळामुळे कुठलेही नुकसान झालेले नसून द्राक्ष पूर्णतः सुरक्षित राहिले आहेत. 

शेतकरी सुरेश कळमकर यावेळी म्हणाले की, आमचा सोनाका द्राक्ष असून त्याला उन्हाचा चटका अधिक बसतो, रंगही जातो. नुकसान झाल्यास नंतर मजुरांचा आणि ईतर खर्च खूप येतो. त्यामुळे क्रॉप कव्हर लावले होते. मात्र झाले असे की उन्हाळ्याच्या दृष्टीने लावले असले तरी आमच्या भागात सगळीकडे गारपीट झाली.  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पण माझ्या बागेला काहीही फटका बसला नाही. गारा क्रॉप कव्हरवर (Crop Cover) पडल्या आणि पाणी खाली गळून पडले. सरकारने सगळ्याच शेतकऱ्यांना जर असे क्रॉप कव्हर दिले तर नुकसान होणार नाही. 

ट्रायल बेसवर प्रयोग सुरु करण्याचा मानस 

दरम्यान रविवारी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी कृषी तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दिंडोरी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच सुरेश कळमकर यांनी केलेला प्रयोग हा कौतुकास्पद असून चालू वर्षी पासून ट्रायल बेसवर हा प्रयोग आपण सुरु करू आणि जे काही मॉडेल सेट होईल ते अमलात आणू अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. 

अनेक वर्षांपासून क्रॉप कव्हर देण्याची मागणी 

तसं बघितलं तर सरकारने क्रॉप कव्हर देण्याची मागणी ही अनेक वर्षांपासून द्राक्ष उत्पादक संघाकडून केली जाते आहे. कृषी विद्यापीठाने देखील याचा अभ्यास करत या कव्हरला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे दादा भुसे यांनी स्वतः कृषीमंत्री असतांना या क्रॉप कव्हर देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप ते अमलात आणले गेले नसून प्रत्यक्षात हा प्रयोग अमलात कधी आणि कसा येणार? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून नक्की कसा दिलासा दिला जाणार? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget