एक्स्प्लोर

Nashik Dada Bhuse : नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा फेरा सुरूच, दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करा, पालकमंत्री भुसेंचे आदेश

Nashik Dada Bhuse : दोन दिवसांत उर्वरित अवकाळीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

 Nashik Dada Bhuse : एकीकडे अवकाळी पावसाचा फेरा नाशिक (Nashik) जिल्ह्यात सुरु आहे. दरम्यान मागील अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचानाम्याचे 50 टक्के काम पूर्ण झालेले असून, येत्या दोन दिवसांत उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. दादा भुसे (Dada Bhuse) हे आज जिल्ह्यातील काही भागात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. 

गेल्या महिनाभरापासून अवकाळीसह गारपिटीचा (hailstorm) नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) अनेक तालुक्यात तडाखा बसला आहे. शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाहणी करत विदारक स्थिती असल्याचे सांगितले होते. त्यांनतर देखील अवकाळी पावसाने हजेरी लावून अनेक भागातील नुकसान केले आहे. एकीकडे पहिल्याच पावसातील पंचनामी पूर्ण होत नसताना अवकाळी पाऊस बरसतो आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिंडोरी (Dindori) तालुक्यात गारपीटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पालकमंत्री दादा भुसे यांनी केली पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तहसीलदार पंकज पवार, गट विकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, माजी आमदार  धनराज महाले, अनिल कदम यांच्यसह शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील कुरनोली, मोहाडी, खडक सुकेने,चिंचखेड,जोपुळ परिसरातील द्राक्ष बाग व इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पाहणी दरम्यान  काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर केलेल्या अच्छादनामुळे त्यांचे गारपीटीमुळे होणारे नुकसान टळल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री दादा भुसे यांनी  शेतकऱ्यांच्या या प्रयोगशीलतेचे कौतुक करीत येणाऱ्या काळात शासनस्तरावरही द्राक्ष बागांचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षित अच्छादनासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही भुसे यांनी यावेळी सांगितले. पाहणी दरम्यान ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती सातबारावर पिककर्जांची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांकडून जिल्हा सहकारी बँकेने पीककर्जाची सक्तीने वसूली करू नये, असे निर्देशही यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा सहकारी बँक अधिकाऱ्यांना दिले.

आजही ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता 

गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने नाशिकसह (Nashik) जिल्ह्याला चांगलंच झोडपलं आहे. दिवसाआड होत असलेल्या गारपिटीमुळे शेतकरी  (Crop Damage) मेटाकुटीला आला आहे. काल सायंकाळी देखील नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी बरसत (Stormy Wind) असल्याने नागरिकांसह शेतकरी हतबल झाला आहे. मार्च महिन्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. आधीच कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. आजही नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण पाऊस येण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget