Amit Shah : मोदींनी सहकारमधील टॅक्स कमी केला, इथेनॉल प्रकल्प दिले, शरद पवारांनी 10 वर्षांत काय केलं? अमित शाहांचा सवाल
Amit Shah Malegaon Speech : सहकार आणि विज्ञान याची जोड दिली तर शेती फायदेशीर ठरते असं सांगत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी मदत केली जाईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिले.
नाशिक : देशासाठी जवान आणि किसान हे महत्त्वाचे असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहकार खातं तयार केलं. त्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचा विकास केला जातोय असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहांनी म्हटलं. शरद पवार हे केंद्रात 10 वर्षे कृषीमंत्री होते, त्यांनी देशासाठी काय केलं असा प्रश्नही त्यांनी विचारला. नाशिकमधील अजंग येथील शेतकऱ्यांसाठी असलेले माती परीक्षण केंद्र आणि अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं. अजंग येथील व्यंकटेशा फॉर्म या ठिकाणच्या सभेतून त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
अमित शाह म्हणाले की, "सहकार क्षेत्रात इन्कम टॅक्स कमी करण्याचे काम केले. साखर कारखान्यांना इथेनॉलचे प्रकल्प देऊन मदत केली. शरद पवार 10 वर्ष कृषिमंत्री होते. त्यांनी साखर कारखाना, शेतकरी, सहकारसाठी काय केले? मार्केटिंग करून नेता बनणे सोपे आहे पण जमिनीवर काम करावे लागते. मोदींनी मल्टिनॅशनल कंपनिशी जोडण्याचे काम केले."
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत
अमित शाह म्हणाले की, "लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान'चा नारा दिला होता. मोदींनी 'जय जवान,जय किसान आणि जय विज्ञान'चा नारा दिला. सहकार आणि विज्ञान याची जोड दिली तर शेती फायदेशीर ठरते. मोदींनी माती परीक्षणाला सुरवात केली तेव्हा मातीत कोणती पिके घ्यावी आणि कोणती घेऊ नयेत हे शेतकऱ्यांना समजलं. पाण्यात पीएच मात्रा किती, सल्फर टाकायचे की नाही, कोणतं पीक घ्यावे याची माहिती मिळते. लॅब तुम्ही बनवली पण ऑर्गनिक परीक्षण लॅब बनवा. भारत सरकारकडून तुम्हाला मदत मिळेल."
ऑर्गेनिक कॉर्पोरेट स्थापन करून शेती माल विक्री करून जो पैसा येणार तो शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. ऑर्गेनिक प्रमाणपत्र असणारे प्रोडक्ट तयार करा असं आवाहन यावेळी अमित शाहांनी शेतकऱ्यांनी केलं. जवान आणि किसान हे दोघेच ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता भारत माताची सेवा करतात असंही ते म्हणाले.
75 वर्षांनी सहकार खात्याची निर्मिती
अमित शाहा म्हणाले की, "मोदींनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनी सहकार खाते तयार केले. आत्मनिर्भरची सुंदर व्याख्या सहकार आहे. यामुळेच शेतकरी समृद्ध होतो. 73 कोटी लिटर पाणी साठवण असणारे तळे बघितले. ठिबकद्वारे सिंचनचे चांगले काम आहे. ऑर्गेनिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडण्याचे काम इथे सुरू आहे. या सोबतच देशाच्या जवानांना जोडण्याचे काम केले."
ही बातमी वाचा: