एक्स्प्लोर

Ajit Pawar : मी पण शेतात जातो म्हणणारे अजित पवार चिखल बघून आल्या पावली माघारी फिरले, गाडी मागवली अन्...

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आज नाशिकच्या दिंडोरीतून सुरुवात झाली आहे. मात्र या यात्रेच्या पहिल्याच मेळाव्याला जाताना चिखलाने नेतेमंडळींची तारांबळ उडाली.

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेला (Jansanman Yatra) आज नाशिकच्या दिंडोरीत (Dindori) सुरुवात झाली आहे.  उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे. मात्र जनसन्मान यात्रेच्या पहिल्या मेळाव्यासाठी जात असताना दिंडोरीत पावसाने झालेल्या चिखलामुळे अजित पवारांसह नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. 

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दिंडोरी तालुक्याला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसामुळे दिंडोरीत अनेक ठिकाणी चिखल झाल्याचे दिसून येत आहे. आज जनसन्मान यात्रेचा पहिला मेळावा दिंडोरीत पार पडत आहे. यासाठी अजित पवार, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह राष्ट्रवादीतील प्रमुख नेते दिंडोरीत दाखल झाले आहेत. 

चिखलामुळे नेत्यांची तारांबळ 

दिंडोरीत जन सन्मान यात्रेच्या मेळाव्याच्या ठिकाणी चिखल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनसन्मान यात्रेच्या पहिल्या मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी जात असताना नेतेमंडळींना चिखलाचा सामना करावा लागला. यावेळी छगन भुजबळ हे चिखलातून वाट काढत कार्यक्रम स्थळी पोहोचले. तर चिखल पाहून अजित पवार मागे थांबले होते. त्यानंतर अजित पवारांसाठी गाडी मागवण्यात आली. अजितदादा गाडीत बसून कार्यक्रम स्थळी गेले. यावेळी अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी गाडीतून कार्यक्रमस्थळापर्यंत प्रवास केला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी झालेल्या चिखलामुळे नेत्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. 

गोकुळ झिरवाळांची जनसन्मान यात्रेकडे पाठ

दरम्यान, नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. आजच्या यात्रेला गोकुळ झिरवाळ उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी मी शरद पवार यांच्या सोबत असून आगामी निवडणुक लढण्याचे देखील त्यांनी संकेत दिले आहेत. यामुळे आता गोकुळ झिरवाळ यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आता गोकुळ झिरवाळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी : नाशिकमधील शरद पवारांचा निष्ठावंत अजित पवारांच्या गळाला? जनसन्मान यात्रा सुरु होताच मोठा गेम

गुलाबी बस अन् गुलाबी जॅकेट, अजित पवारांच्या 'जनसन्मान यात्रे'साठी मेगा प्लॅनिंग, आजपासून महाराष्ट्र पिंजून काढणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC :बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का?ठाकरेंचा मोदींवर घणाघातAllu Arjun Arrested :  पुष्पा 2 प्रिमियरला चेंगराचेंगरी,  चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला अटकAllu Arjun Arrested Full Video : Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाईSanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Asaduddin Owaisi on Hindus in Bangladesh : असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला; परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
Eknath Shinde list of possible ministers : प्रकाश आबिटकर की राजेश क्षीरसागर की राजेंद्र पाटील यड्रावकर? शिंदेसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!
प्रकाश आबिटकर की राजेश क्षीरसागर की राजेंद्र पाटील यड्रावकर? शिंदेसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!
Allu Arjun Arrested Full Video : Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई
Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई
Embed widget