गुलाबी बस अन् गुलाबी जॅकेट, अजित पवारांच्या 'जनसन्मान यात्रे'साठी मेगा प्लॅनिंग, आजपासून महाराष्ट्र पिंजून काढणार!
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा अयोजित केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकतीने तयारी चालू केली आहे. या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फए जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला आजपासून (8 ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघआतून या यात्रेला सुरुवात होणार असून त्या निमित्ताने या यात्रेसाठीच्या बसवर लाडकी बहीण या योजनेची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या संदस्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घातलेले आहे.
बसवर लाडकी बहीण योजनेची माहिती
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी राष्ट्रवादीने चांगली तयारी केली आहे. अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करणार आहेत. या यात्रेतील बसवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनसन्मान यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या टीम मेंम्बरनेही गुलाबी रंगाचेच जॅकेट्स परिधान केले आहेत.
राष्ट्रवादीचे झेंडे आणि होर्डिंग्ज
या यात्रेच्या स्वागताला महाविद्यालयीन तरुण-तरुणीची उपस्थिती असेल. सोबतच दिंडोरी भागात विमानतळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आणि होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या यात्रेसाठी अजित पवार तसेच इतर नेत्यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर जनसन्मान यात्रेला प्रारंभ होईल.
राष्ट्रवादी फुंकणार निवडणुकीचे रणशिंग
पुढच्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापासूनच कंबर कसली आहे. सनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्यातील जास्तीत जास्त जनतेशी संपर्क साधणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेमुळे महिलांची मतं आम्हाला मिळू शकतात, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना आहे. म्हणूनच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या जनसन्मान यांत्रेत अधिकाधिक गुलाबी रंग वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला यश मिळणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा :
बाळा मी इथेच आहे; पुस्तक प्रकाशनावेळी आईचा आवाज ऐकताच मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यात पाणी