एक्स्प्लोर

Nandurbar News: कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने गणेश मूर्ती 30 टक्क्याने महाग होणार, गणेश मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात

गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबार येथील गणपती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये येत असून आतापासूनच आपल्या मंडळासाठीच्या मूर्ती बुक करून घेत आहेत .

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोना काळात असलेले निर्बंध आणि गणेश मूर्तींच्या उंचीवरील मर्यादा यामुळे गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर मोठ्या आर्थिक संकट आले होते. मात्र यावर्षी सरकारने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा उठवल्याने गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे. नंदुरबार शहरात गणेश मूर्ती बनवणारे लहान मोठे 100 कारखाने असून हजारो गणेश मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. सात इंचापासून तर 22 फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

 पेणनंतर नंदुरबारच्या गणेशमूर्तींना बाजारात मोठी मागणी असते गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नंदुरबारमधून गणेश मूर्ती जात असतात. यावर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली असून त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत तीस टक्क्यांनी वाढणार आहेत. तर दुसरीकडे गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध सरकारने उठवल्याने सार्वजनिक मंडळाच्या वतीने मोठमोठ्या गणेश मूर्ती यांची मागणी वाढली आहे अशी माहिती मूर्तिकार नारायण वाघ यांनी दिले आहे.

 सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींची बुकिंग सुरू झाली आहे. मंडळाचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबार येथील गणपती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये येत असून आतापासूनच आपल्या मंडळासाठीच्या मूर्ती बुक करून घेत आहेत . यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये 30 टक्के पेक्षा अधिकची वाढ होणार असल्याने लहान मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा   हिरमोड होत आहे 

गणेशभक्तांना  गणेशोत्सवाचे वेध लागले असून शहरातील मुख्य ठिकाणी गणेश मूर्ती केंद्रही थाटले आहेत. तर ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. पेण तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गणेशमूर्तींना परदेशात मॉरीशिअस, थायलंड, ऑस्ट्रेलिया, युरोप सारख्या अनेक देशात मागणी असल्याने  दरवर्षी 25 ते 30 हजार गणेशमूर्ती रवाना करण्यात येतात. गणेशमूर्तींच्या दरात वाढ झाली असताना भाविकांमधील गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे.

पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा

गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे 4 फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी उंच मुर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना 'एक खिडकी' पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Vs Atul Benke|माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, हिम्मत असेल तर.. सुळेंची बेनकेंवर टीकाMuddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Embed widget