Nandurbar News : 'कचरा वेचणाऱ्या हातात जेव्हा, पाटी पेन्सिल येते', नंदुरबारमधील कचरावेचक मुलांच्या आयुष्यात पेटली ज्ञानाची ज्योत!
Nandurbar News : प्रत्येक शहरात आणि गावाच्या कोपऱ्याला भीक मागून आणि कचरा वेचून जीवन जगणारी मंडळी पाहायला मिळते.
नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा शहराच्या एका कोपऱ्यात असलेली मांगरवाडी या वस्तीत कुणीच शिक्षण (Education) घेतलेले नाही. त्यामुळे शिक्षणाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. घरातील सदस्यांप्रमाणेच इथली लहान मुलं पण कचरा वेचून आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र याच मुलांच्या आयुष्यात शहादा (Shahada) येथील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवा अंकुर रुजू लागला आहे. ही सर्वच मुले शिक्षणाच्या प्रवाहात आल्याने वस्तीत ज्ञानरूपी प्रकाश पडू लागला आहे.
माणसाच्या आयुष्यात शिक्षण खूपच महत्वाचं झालं आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही, असं म्हटलं जात. आजही अनेक भागात शिक्षणापासून वंचित असलेला घटक दिसून येतो. प्रत्येक शहरात आणि गावाच्या कोपऱ्याला भीक मागून आणि कचरा वेचून जीवन जगणारी मंडळी पाहायला मिळते. अशावेळी काळीज पिळवटून जाते. इथली लहान लहान मुलंही कधी रस्त्यात, सिग्नलवर भीक मागताना दिसून येतात. त्यांच्या पिढ्यापिढ्या शिक्षणाचा संबंध आलेला नाही नाही, अशाच वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या कुठल्याही प्रकारची कागदपत्र नसल्याने त्यांचा शाळेतही प्रवेश होत नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच ते कचरा वेचायला जाणं आणि शहरभर फिरून भीक मागून जीवन जगणं हा त्यांचा नित्य नियम, मात्र घरात कोणी शिकलेला नसल्यामुळे शिक्षणाचही महत्व नाही, हाच मुद्दा उचलून धरत शहादा येथील इन्कलाब फाउंडेशनच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दिवसभर आई-वडिलांसोबत कचरावे त्याला जाणं किंवा भीक मागायला जाणे, या चिमुकल्यांच्या जीवनातला नित्यक्रम मात्र आता शिक्षण मिळू लागल्याने या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. जे हात कचरा वेचण्यासाठी दिवसभर राबत होते, ते हात आता पाटी पेन्सिलवर शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आता लिहिता-वाचता यायला लागले असून याबाबतचे समाधान या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय.एकीकडे सरकारच्या अनेक योजना आहेत शिक्षणासाठी शिक्षणा हक्काचा कायदा हे मात्र आजही शहरी भागातील अनेक मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही, मात्र हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.
दररोज सायंकाळी वस्तीवरची शाळा
शहादा शहरातील मांगरवाडी परिसरात कोणी शिकलेले नसल्याने या विद्यार्थ्यांचे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नाहीत. मात्र काहीशी माहिती मिळवून संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचे आधारकार्ड, जन्मदाखला यास इतर कागदपत्र तयार केली. त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला, मात्र गोष्ट प्रवेश मिळवून देण्यावर थांबणार नव्हती. कारण की पिढ्यांना पिढ्या शिक्षणाशी संबंध नसलेल्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्य महत्वाचं होत. म्हणून काही मुलींनी पुढाकार घेत रोज सायंकाळी यांच्या वस्तीतच त्यांची शाळा भरू लागली. मुलांना दररोज प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जाऊ लागले. तीन महिन्यात या मुलांची शैक्षणिक प्रगती इतकी आहे की ते आता लिहू शकता वाचू शकता आणि शाळेतल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच ते शैक्षणिक प्रगती करत आहेत.
इतर महत्वाची बातमी :