मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे. त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मात्र त्यापूर्वीच जरांगे पाटलांनी महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांच्या दौऱ्यातून दिसून येत आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून मराठ्यांनी पाठिंबा दिला होता शिवाय आंतरवाली सराटीतील सभेतदेखील सर्व महाराष्ट्रातून मराठे कोसोदूर प्रवास करत आले होते. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातील मराठ्यांचा यात सहभाग होता. आज पुणे जिल्ह्यातही तशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळणार आहे. प्रत्येक सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या सभेची तयारी करण्यात येत आहे. आता या सभेत जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
Manoj Jarange Rajgurunagar Sabha Live
[yt]https://www.youtube.com/watch?v=SLRD5_KGJYI[/yt]
जळगावचा यश महाले, NDA मध्ये चमक दाखवली, प्रशिक्षणावेळी गंभीर दुखापत; देशाने भावी लेफ्टनंट कर्नल गमावला
मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी
Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र घेतलं म्हणजे झालं का? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange : मोर्चे काढले पण सर्वांनी आरक्षण समजून नाही घेतलं.. घराघरातील लोकांना आरक्षण माहिती होणं गरजेचं होतं..कुणबी म्हणजे शेती. तुम्ही आता का आरक्षण सोडत नाही हे पक्क झालं आहे. कुणबी प्रमाणपत्र घेतलं म्हणजे झालं का, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
Manoj Jarange : मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange : आपल्यातील एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे.मला मराठा समाजाचे वेदना सहन होत नाही
Manoj Jarange LIVE : हे युद्ध रोखण्याचे ताकद कुणाच्यात नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange LIVE : हे युद्ध रोखण्याचे ताकद कुणाच्यात नाही : मनोज जरांगेहे युद्ध रोखण्याचे ताकद कुणाच्यात नाही. मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा शब्द आहे माझा. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे मी कधीच जात नाही. मी माझ्या समाजाला माय बाप म्हणतो. मग माझ्या समाजाची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? - मनोज जरांगे