Nandurbar : नंदूरबार जिल्ह्यातील नवागावात 18 लाखांचा गांजा जप्त, माजी झेडपी सदस्याची केळीच्या आडून गांजाची लागवड
Nandurbar News : शहादा (Shahada) तालुक्यातील माजी झेडपी सदस्याने केळीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नंदूरबार : धुळे जिल्ह्यातील (dhule) शिरपूर तालुक्यातील कारवाईला 24 तास उलटत नाही तोच शिरपूरजवळच्या नंदुरबारमध्ये (Nandurbar) आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. शहादा (Shahada) तालुक्यातील नवागाव येथील माजी झेडपी सदस्याने केळीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली असून 18 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नंदुरबार (Nandurbar District) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नवागाव येथील केळीच्या (Banana farm) शेतात बेकायदेशीर गांजाची शेती आढळून आल्याने आली आहे. जिल्हा परिषद माजी सदस्याने केळीच्या बागेत गांजाची (Ganja) शेती होत असल्याचं पोलिसांना समजले. यानंतर शहादा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार पथकाने अचानक धाड टाकण्यात आली. त्यात 253 किलो 18 ग्रॅम वजनाचे गांजा मिळून आला असून बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत 17 लाख 74 हजार 662 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे जिल्ह्यात अमली पदार्थ मुक्ताच्या गोष्टी करणाऱ्या पोलीस दलातील (Nandurbar Police) अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाईमुळं नंदुरबार जिल्ह्यात खरंच आमले पदार्थ मुक्त जिल्हा आहे का असा काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
सध्या नाशिक (Nashik) विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यात गांजाची लागवड केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्याचे पोलीस सतर्क झाले असून ठिकठिकाणी कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अवघ्या 24 तासांपूर्वी शिरपूर तालुक्यात तब्बल तीन कोटींचा गांजा जप्त करण्यात आला होता. येथील शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. त्यानंतर आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पोलिसांनी कारवाई केली आहे. चक्क केळीच्या बागेत गांजाची लागवड केल्याचे समोर आले आहे. तब्बल 17 लाख 74 हजार 662 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यात एक कोटींचा गांजा जप्त
धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे शेतात गांजाची लागवड केल्याचे समोर आले. शिरपूर पोलिसांनी पथक तयार करत मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता शेतात तूर, मका व कापुस या पिकात मध्यभागी अंदाजे तीन ते सहा फुट उंचीचे एकुण 487 गांजाची रोपे मिळून आले. एकुण 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा तीन कोटी दहा हजार रुपयांचा किंमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गांजा लागवड करणारे मोहन शामा पावरा व भावसिंग भोंग्या पावरा दोन्ही रा.लाकड्या हनुमान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर महत्वाची बातमी :