Aurangzeb kabar: औरंगजेबाची कबर न हटवल्यास लाखोंच्या संख्येने संभाजीनगरला जाऊन कारसेवा करु; विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक
chhatrapati sambhaji nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मोहीम. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून, राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता भर पडलीय ती विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाची. औरंगजेबची कबर तातडीने हटवण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. यासंदर्भात तिथीनुसार उद्या शिवजयंतीच्या दिवशी औरंग्याची कबर (Aurangzeb kabar) हटाव मोहीम हाती घेण्यात येईल. औरंगजेबाची कबर न हटवल्यास, कारसेवा करु अशा इशारा बजरंग दलाकडून (Bajrang Dal) देण्यात आला आहे. शिवजयंतीला राज्यातील सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय भारतात कुठेही नको. राज्य सरकारने पुढील काळात केंद्र सरकारशी चर्चा करुन औरंगजेबाची कबर नियमानुसार काढावी. नाहीतर बजरंग दल कारसेवा करुन ही कबर काढून टाकेल. ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या भावाला मारलं, बापाला मारलं, हजारो हिंदूंचं धर्मांतर केलं, त्याची कबर महाराष्ट्रात असणं हे दुर्दैव आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही कबर काढून टाकावी. अन्यथा बजरंग दल लाखोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल. आम्ही राज्य सरकारला सांगून औरंगजेबाची कबर उखडून टाकू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत.
मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदी
औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे अप्पर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी एकबोटे यांच्या जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत. 29 मार्च रोजी संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मिलिंद एकबोटे औरंगजेबची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना 16 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत. याशिवाय औरंगजेबची कबर असलेल्या भागात पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे. या ठिकाणी एसआरपीची एक तुकडी, दोन अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. तर दोन ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली औरंगजेबच्या कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाची नीट तपासणी करुनच सोडण्यात येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
