Nanded : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा 1 ते 4 मे असे चार दिवस येलो अलर्ट; काळजी घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहन
Nanded News : वादळी वारे वाहण्याचा, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
Nanded News : मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांनी आज (30 एप्रिल) रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी (Nanded District) आजपासून पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जरी करण्यात आला आहे. म्हणजेच 1 ते 4 मी पर्यंत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट राहणार आहे. त्यामुळे या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 1, 2, 3 व 4 मे 2023 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या चार दिवसांपासून नांदेडसह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान आणखी काही दिवस नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर नांदेड जिल्ह्यात 1 ते 4 मी पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या चार दिवसात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठवाड्यात उद्या अवकाळी पावसाची शक्यता...
मराठवाड्यात उद्या (1 मे) रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता, तर उस्मानाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान...
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील 6 हजार 627 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर एकूण 12 हजार 141 शेतकऱ्यांना अवकाळीचं फटका बसला आहे. ज्यात 1 हजार 139 हेक्टरवरील जिरायत पिकांचे नुकसान झाले असून, 3 हजार 838 हेक्टरवरील बागायत आणि 1 हजार 649 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 882 हेक्टर म्हणजेच 28.40 टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
कृषिमंत्री सत्तार सलग दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या बांधावर; जालना जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी