एक्स्प्लोर

Nanded News: नांदेडच्या पठ्ठ्याने जातीच्या भिंती पाडल्या, CA होऊन प्रेमाला मिळवलं, 9 वर्षे दोघांनी वाट पाहिली, कुटुंबाची सहमतीने लगीनगाठ बांधली!

Nanded News: नांदेडच्या किनाळा या खेड्या गावातील तरूण शिवाजी माने आणि नांदेडच्या दिपा यांनी प्रेमापुढे शेवटी जातीच्या भिंती तोडल्या आणि 16 मार्च रोजी घरच्यांच्या संमतीने कोर्ट मॅरेज करत दोघेही लग्नबंधनात बांधले गेले.

Nanded News: नांदेडच्या किनाळा या खेड्या गावातील तरूण शिवाजी माने या तरुणाला CA अभ्यासक्रमा दरम्यान नांदेडच्या दिपा ह्या तरुणीवर प्रेम जडलं. मात्र या प्रेमाला विरोध होता. तो वेगवेगळ्या जातींचा आणि शिवाजी आणि दिपा हीच्या घरच्यांचा, मात्र दोघांच्याही एकमेकांवर असलेल्या अढळ प्रेमापुढे शेवटी जातीच्या भिंती तुटल्या आणि 16 मार्च रोजी घरच्यांच्या संमतीने कोर्ट मॅरेज करत दोघेही लग्नबंधनात बांधले गेले.

आज काल अपण अनेक प्रेम प्रकरण बगतो ज्यातून आंतरजातीय प्रेम असल्यामुळे घरच्यांच्या विरोधामुळे तरुण-तरुणी एकतर आत्महत्या करतात किंवा आपल्याच जातीतील मुलीसोबत किंवा मुलासोबत लग्न करून आपल्या प्रेमाचा त्याग करून आयुष्यभर एकमेकांना दोष देतात. हीच परिस्थीती आली होती नांदेडच्या किनाळा गावात राहणाऱ्या CA शिवाजी माने ह्या तरुणावर, ग्रामीण भागातून नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील पहिला CA होण्याचा मान शिवाजी माने ह्या तरुणाला मिळाला, CA च्या अभ्यासा दरम्यान त्याला नांदेड मध्ये राहणार्‍या दिपा ह्या मुलीसोबत प्रेम झालं. काही वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दिपाच्या घरच्यांना दोघांच्या प्रेमाबद्दल समजले, मात्र मुलगा दुसऱ्या जातीतला असल्यामुळे दोघांच्याही घरच्यांचा ह्या लग्नाला विरोध होता, मात्र शिवाजी आणि दिपा हे एकमेकांच्या प्रेमावर ठाम होते.

जातीतील मुलासोबत लग्न करण्याचा दबाव- (Nanded News)

गेल्या 9 वर्षांपासून शिवाजी आणि दिपा हीच्यावर आपल्याच जातीतील मुलासोबत लग्न करण्याचे दबाव होता, मात्र दोघांनीही घरच्यांना सांगितलं एकतर आम्ही एकमेकांसोबत विवाह करणार नाहीतर आयुष्यभर असेच विना लग्नाचे एकटे राहू, दरम्यानच्या 9 वर्षांत दोघांच्याही छोट्या भावाचे आणि बहिणीचे लग्न झाले मात्र हे दोघेही तशेच घरच्यांची  संमती घेण्यासाठी रडत, पडत राहिले, दोघांनाही पळून जाऊन लग्न करण्याचा पर्याय होता. मात्र लग्न करणार तर घरच्यांच्या संमतीने ही खूणगाठ ह्या दोघांनी बांधली होती.

आयुष्यात यशस्वी होऊन विवाह- (Nanded News)

9 वर्षे घरच्यांचा लग्नाला विरोध होता. मात्र शिवाजी हा मागे हटला नाही, त्याने आपलं CA च शिक्षण पुर्ण करून नांदेड शहरात स्व:तचे ऑफिस सुरू केले, चांगली कमाई केली, कार खरेदी केली, गावाकडचे घर बांधले, नांदेडमध्ये जमीन खरेदी केली. हे सर्व पाहूण मुलीच्या वडीलांनापण वाटलं की हा मुलगा होतकरू आहे, मेहनती आहे आणि निर्व्यसनी आहे, आपली मुलगी ह्याच्यासोबत आनंदी राहू शकते, त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी सुध्दा ह्या लग्नाला होकार दिला.

सामाजिक एकतेचा संदेश- (Nanded News)

शिवाजी सांगतो की त्याच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे आदर्श आहेत, आणि ह्या सर्वांनी सामाजीक एकतेचा संदेश दिला आहे, आपण मानसापेक्षा जातीच्या भिंती उंच केल्यामुळे आपल्या देशाची प्रगती सुध्दा खुंटली आहे, ज्यावेळी आपण समाजातील हे भेदभाव विसरू त्याचवेळी खऱ्या अर्थाने आपला देश हा महासत्ता होऊ शकतो. मी ज्या मुलीवर प्रेम केलं तीच्यासोबत लग्न केलं, आमच्यासाठी जातींपेक्षा एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास हे महत्वाचं आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget