एक्स्प्लोर

मराठवाड्यात आंदोलन पेटलं! जालन्यात तहसीलदाराची गाडी फोडली; संभाजीनगर हिंगोली,परभणी, नांदेड लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद

Maratha Reservation : परभणी आणि हिंगोली दोन जिल्ह्यातील एकूण 7 आगारातील 380 बसेचच्या 2800 फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेलं आंदोलन मराठवाड्यात (Marathwada) तापताना पाहायला मिळत आहे. जालना येथे महिला तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली आहे. तर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तापले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एसटी सेवा रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चारही जिल्ह्यातील बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यात एकूण 30 आगर असून, अंदाजे 2800 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

मराठा आरक्षण आंदोलनाचा परिवहन विभागाला फटका बसतांना पाहायला मिळत आहे. नांदेड, हिंगोली,प रभणी आणि लातूर जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे आयजी महावरकर आणि हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या सुचनेनुसार एसटी विभागाने बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी आणि हिंगोली दोन जिल्ह्यातील एकूण 7 आगारातील 380 बसेचच्या 2800 फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास 350 बसेस जागेवर उभ्या आहेत. तसेच, आज सायंकाळी पाच वाजेनंतर उद्या बस सुरु करायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. 

तहसीलदाराची गाडी फोडली... 

जालना येथील आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तहसीलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे. जालन्यातील रामनगर येथील ही घटना असल्याचे समोर येत आहे. बाजीउम्रद येथील मोबाईल टॉवरवर चढलेलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ही गाडी फोडण्यात आली आहे. तहसीलदार यांनी चर्चेसाठी गावात येण्याची गावकऱ्यांची मागणी होती. त्यानंतर रामनगर येथे आंदोलकांकडून रस्ता रोको देखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आंदोलनस्थळा जवलून जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. 

बीड-नांदेडमध्ये बसवर दगडफेक...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत असून, बीड आणि नांदेडमध्ये आज बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. बीडहून कल्याणकडे जाणारी एसटी बस चराटा फाट्याजवळ आली असता, यावेळी आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरवून या बसवर तुफान दगडफेक केली. यामध्ये बसच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत. तर दुसऱ्या घटनेत नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केलीय. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झालंय. या प्रकरणी पोलीस दगडफेक करणाऱ्या लोकांचा शोध घेतायत. मराठवाड्यातील या घटना पाहता एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून एसटी बसेस रद्द करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधून सुटणाऱ्या एसटी बसेस रद्द

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget