एक्स्प्लोर

Nanded : चुकीचा फेरफार केला, कपाळावरचं कुंकू पुसलं, पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या तलाठ्याचा बँड लावून जाहीर सत्कार, पीडित महिलेने छापली पत्रिका

Nanded Himayatnagar Talathi : तलाठ्याने आणि मंडल अधिकाऱ्याने चुकीचा फेरफार करून जमीन दुसऱ्याच्या नावे केल्यानंतर परमेश्वर जाधव यांनी आत्महत्या केली होती. तरीही संबंधितांवर कारवाई न झाल्याने पीडित महिलेने हे पाऊल उचललं आहे. 

नांदेड: शासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्यांना कसं लुटतात याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये आला आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करून तलाठ्याने (Talathi of Himayatnagar) चुकीचा फेरफार तयार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर एका शेतकरी महिलेने तलाठ्याचा सत्कार करण्यासाठी चक्क सत्कार पत्रिका छापली. जाणीवपूर्वक चुकीचा फेरफार तयार करून माझ्या कपळावरचं कुंकू पुसून माझ्या लहान लेकरांना पोरके करणाऱ्या कर्तृत्वान इनामदार तलाठ्याचा भव्य सत्कार, अशा आशयाची पत्रिका पीडित महिलेने छापली. ही पत्रिका आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

चुकीचा फेरफार केल्याने पतीची आत्महत्या

जोत्स्ना जाधव यांचे पती परमेश्वर जाधव यांची हिमायतनगर शहराजवळ नऊ गुंठे जमीन होती. पण त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत शेख इरफान आणि मिर्झा जुनेद या दोघांनी बनावट कागपत्रांद्वारे ती जमीन स्वतःच्या नावावर करुन घेतली. यासाठी त्यांना तलाठी दत्तात्रय पुणेकर आणि मंडल अधिकाऱ्याने जमिनीचा चुकीचा फेरफार करुन दिला असा ज्योत्स्ना जाधव यांचा आरोप आहे. जमीन गेल्याने परमेश्वर जाधव यांनी 28 नोहेंबर रोजी आत्महत्या केली. 

तलाठ्यावर अद्याप कारवाई नाही

पतीच्या आत्महत्येनंतर ज्योत्स्ना जाधव यांनी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. तसेच चुकीचा फेरफार केल्याची तक्रार देखील केल्यानंतर उप विभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी फेरफार रद्द केला. चुकीचा फेरफार रद्द केला पण तो करणाऱ्या तलाठ्यावर आणि मंडल अधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पीडित महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 

अधिकाऱ्यांनी नवऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करून माझं घर उघड्यावर आणले, त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल माझी अणि पोरक्या मुलांची इच्छा आहे की भर चौकात बँड लावून हिमायतनगर येथील तलाठ्याचा भव्य सत्कार करावा आणि यावेळी आपणही उपस्थित राहिलात तर आम्हाला अधिक आनंद होईल, असं निमंत्रण देणारी पत्रिकाचं छापली आहे. 

आता पीडित महिलेने छापलेल्या पत्रिकेनंतरही निर्ढावलेले आणि सुस्त प्रशासन या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करणार का आणि त्या महिलेला तिची जमीन परत देऊन न्याय देणार का हे पाहावं लागेल. या प्रकरणात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे. 

ही बातमी वाचा: 



 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Saksham Tate Death Case: सासर सोडण्यामागचं खरं कारण समोर! आंचल मामिडवारचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; ट्रोलर्सनाही दिले उत्तर, आईच्या आरोपावर म्हणाली...
सासर सोडण्यामागचं खरं कारण समोर! आंचल मामिडवारचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; ट्रोलर्सनाही दिले उत्तर, आईच्या आरोपावर म्हणाली...
Saksham Tate Death Case: आंचल मामडीवार घर सोडून गेली; सक्षम ताटेच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आई एकटी पडली, वकील द्यायला पैसे नाहीत, आईची मन हेलावणारी व्यथा
आंचल मामडीवार घर सोडून गेली; सक्षम ताटेच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आई एकटी पडली, वकील द्यायला पैसे नाहीत, आईची मन हेलावणारी व्यथा
Nanded Crime Aanchal Mamidwar: सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Gurnoor Brar: पहिल्याच ओव्हरमधील पाचव्या बाॅलवर विकेट घेत गुरनूर ब्रारची टीम इंडियात धडाकेबाज एन्ट्री!
Video: पहिल्याच ओव्हरमधील पाचव्या बाॅलवर विकेट घेत गुरनूर ब्रारची टीम इंडियात धडाकेबाज एन्ट्री!
Danni Wyatt-Hodge: कधी काळी केलं होतं विराट कोहलीला प्रपोज अन् आता महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये शतकी तडाखा! इंग्लंडने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या सुद्धा रचली
कधी काळी केलं होतं विराट कोहलीला प्रपोज अन् आता महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये शतकी तडाखा! इंग्लंडने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या सुद्धा रचली
ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ
ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2026 | शनिवार
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, अफगाणिस्तान पहिल्यांदा बॅटिंग करणार; 'या' दोन खेळाडूंनी पदार्पण केलं
टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, अफगाणिस्तान पहिल्यांदा बॅटिंग करणार; 'या' दोन खेळाडूंनी पदार्पण केलं
Embed widget