(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Rainfall Update : नांदेड जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली, आतापर्यंत झाला एवढा पाऊस?
Nanded Rainfall Update : नांदेड जिल्ह्यात 780 मिमी पाऊस अपेक्षित होता, तर आतापर्यंत प्रत्यक्षात 820 मिमी पाऊस झाला आहे.
Nanded Rainfall Update : मराठवाड्यातील (Marathwada) काही भागांत गेल्या चार दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर, नांदेड (Nanded) जिल्ह्यात देखील समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे, नांदेड जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली असून, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)जिल्हा देखील पावसाच्या सरासरीजवळ आहे. मात्र, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, जालना, हिंगोलीसह 35 तालुक्यांत अद्याप सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. 24 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्याची सरासरी 646.3 मिमी आहे. मात्र, प्रत्यक्ष 520 मिमी म्हणजेच 80 टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात 780 मिमी पाऊस अपेक्षित होता, तर आतापर्यंत प्रत्यक्षात 820 मिमी पाऊस झाला आहे.
मागील 24 तासांत 19 मि.मी. पावसाची नोंद
नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर, मुखेड तालुक्यातील 3 व देगलूर तालुक्यातील 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 820 मि.मी. पाऊस झाला आहे. तर मागील 24 तासांत नांदेड तालुक्यात 11.30, बिलोली 27.60, मुखेड 38.50, कंधार 16.10, लोहा 12.90, हदगाव 20.50, भोकर 8.70, देगलूर 42.30, किनवट 11.10, मुदखेड 11.60, हिमायतनगर 14.40, माहूर 3.80, धर्माबाद 20.90, उमरी 14.40, अर्धापूर 11.20, नायगाव 17.50 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सरासरी गाठणारे तालुके
छत्रपती संभाजीनगरमधील: गंगापूर – 95.2 मिमी, वैजापूर- 103.9मिमी, कन्नड 93.5 मिमी, खुलताबाद 108.8 मिमी, सोयगाव – 83.9 मिमी, सिल्लोड 103.4 मिमी, फुलंब्री - 80.1 मिमी, बीड - 90 मिमी पाऊस झाला आहे.
नांदेड जिल्हा : नांदेड- 11.2 मिमी, बिलोली - 137.1 मिमी, मुखेड – 119.3 मिमी, कंधार- 70.9 मिमी, लोहा - 92.3 मिमी, हादगाव 92.6 मिमी, भोकर -110.1 मिमी, देगलूर – 128.1 मिमी, किनवट – 120.4 मिमी, मुदखेड -106.4 मिमी, हिमायतनगर- 79.9 मिमी, माहूर – 118.2 मिमी, धर्माबाद- 134.0 मिमी, उमरी - 110.9 मिमी, अर्धापूर- 123.2 मिमी, नायगान के. 196.8 मिमी पाऊस झाला आहे.
मांजरम परिसरात ढगफुटी सदृश पाऊस...
नायगाव तालुक्यातील मांजरम परिसरात ढगफुटी सदृश पावसाने झोडपून काढल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नदीकाठच्या व इतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे. मांजरम व मांजरमवाडी या परिसरामध्ये 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ढगफुटीसारखा पाऊस होऊन या परिसरामध्ये नदीकाठच्या व इतर भागांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. यात हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
मराठवाड्यात निम्माही पाऊस न झालेले 25 तालुके
बीड जिल्ह्यात परळी 52.2, धारूर- 55.1, वडवणी 53.3. गेवराई - 58.8, माजलगाव- 60.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
लातूर जिल्ह्यात लातूर- 62.4, औसा - 64.5, अहमदपूर - 64.9, चाकूर - 54.7, रेणापूर – 55.7 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव 62.6, तुळजापूर 64.7, कळंब- 64.7, वाशी- 64.1 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर - 59.4, मंठा 57.6, तसेच परभणी- 59.5, गंगाखेड - 62.9, जिंतूर- 58.3, सोनपेठ –55.0, मानवत 61..9 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: