(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded: आदिवासी पाड्यावरील नागूबाई जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तिरंगा फडकवितात
Nanded News: एकेक पाडा निवडून त्या ठिकाणी आदिवासी बांधवांसमवेत घरोघरी तिरंगा उत्सव साजरा करण्यात आला.
Nanded News: तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामपोड या अतिदुर्गम आदिवासी कोलामवस्तीवर सुद्धा "घरोघरी तिरंगा" उपक्रम राबवण्यात आलाय. चारी बाजूने डोंगर रांगेत विसावलेल्या तब्बल 23 कोलाम वस्ती व इतर आदिवासी पाडे या उत्सवात हिरीरीने सहभागी झाले होते. अवघ्या 15 उबंरठयाच्या कोलामपोड येथील या उत्सवाला साक्षीदार होण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.
यावेळी गावातील जेष्ठ महिला नागुबाई अर्जून टेकाम ही महिला गावातील इतर महिला समवेत आपल्या दाराला तिरंगा लावण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले होते. सडे आणि रांगोळीने सजलेल्या खांबाला तीने तिरंगा लावून देश प्रेमाची एक नवी ऊर्जा त्यांच्यात पाहायला मिळत होती. "या देशाची आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व देशाप्रती कृतज्ञता म्हणून आम्हाला हा तिरंगा उत्सव साजरा करताना विशेष आनंद असल्याच्या भावना" नागुबाईने आपल्या तोडक्या भाषेत व्यक्त केल्या.
अधिकारी पोहचले पाड्यावर...
किनवट येथील आदिवासी विकास प्रकल्प मार्फत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा हा उपक्रम प्रत्येक पाड्यावर साजरा होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रकल्पातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः एकेक पाडा निवडून त्या ठिकाणी आदिवासी बांधवांसमवेत घरोघरी तिरंगा उत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
गावातून तिरंगा रॅली निघाली...
यावेळी मान्यवरांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गावातून, विविध पाडयामधून विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून अवघा परिसर देशभक्तीमय केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगवान बिरसा मुंडा, शामादादा कोलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. लिंबगुडा येथील रहिवाशी व शासकीय आश्रमशाळा तलाईगुडा येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदिम कोलाम समाजातील जयश्री भीमराव पुरके ही जवाहर नवोदय विद्यालयात प्रविष्ठ झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा येथील विद्यार्थिनी व तलाईगुडा येथील युवकांनी आदिवासी ढेमसा नृत्य सुद्धा सादर केले.
महत्वाच्या बातम्या...
Nanded : डांबराच्या जमिनीत झाडं लावण्याचा राष्ट्रीय महामार्ग कार्यालय आणि कंत्राटदाराचा प्रताप