Nanded Yuva Sena Agitation : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरुन युवा सेना आक्रमक, नांदेडमध्ये काढला ट्रॅक्टर मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बिलोली तहसील कार्यालयावर युवा सेनेच्या (Yuva Sena) वतीने ट्रॅक्टर मोर्चा मोर्चा काढण्यात आला.
Nanded Yuva Sena Agitation : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बिलोली तहसील कार्यालयावर युवा सेनेच्या (Yuva Sena) वतीने ट्रॅक्टर मोर्चा मोर्चा काढण्यात आला. 50 ते 60 ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. सततच्या अतिवृष्टिमुळं बिलोली तालुक्यातील खरीप पिकं हातची गेली आहेत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून अद्याप कोणतीही तत्काळ व ठोस मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळं युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. गेल्या दोन महिन्यापासून बिलोली तालुक्यात सतत अतिवृष्टिचा कहर चालूच आहे. त्यामुळं खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबिन, तूर, कापूस यासह अन्य पिके वाया गेली आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी शासनाकडे मोठ्या मदतीच्या अपेक्षेने डोळे लागून बसले होते. पण शासनाने नुकतीच हेक्टरी 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण ही मदत तुटपुंजी आहे. त्यामुळं शेतकरी चिंतातूर आहेत. त्यामुळं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
हा मोर्चा काढण्यात आला.
या आहेत मागण्या
युवा सेनेच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिलोली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी. तसेच नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, पडझड झालेल्या घराचे पंचनामे करुन तत्काळ मदत देण्यात यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी. यासह अन्य मागण्यांसाठी युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत 50 ते 60 ट्रॅक्टरसह भव्य असा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी सेती पिकाचे नुकसान झाले आहे. विशेषत मराठवाडा आणि विदर्भातील शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: