एक्स्प्लोर

Nanded: महिला विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असतानाच मागून आलेल्या वानराने दिला धक्का आणि...

Nanded News: महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहरीवर पाणी भरण्यास गेलेल्या महिलेला चक्क वानराने विहिरीत ढकलून दिल्याची घटना घडलीय. दरम्यान विहिरीशेजारी असलेल्या नागरिकांनी सतर्कता बाळगत या महिलेला विहिरीच्या बाहेर काढल्याने, मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र विहिरीत पडल्याने महिला जखमी झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  नांदगावात असलेल्या एका विहिरीतून गावातील महिला पाणी आणतात. दरम्यान गावातील पल्लवी पंडीत ताबारे या नेहमीप्रमाणे पाणी आणण्यासाठी हंडा घेऊन विहिरीवर गेल्या होत्या. विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्या वाकताच मागून आलेल्या एका वानराने त्यांना विहिरीत ढकलून दिले. त्यामुळे त्या विहिरीत पडल्या. 

गावकऱ्यांनी महिलेला विहिरीतून काढले बाहेर 

पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या पल्लवी ताबारे यांना वानराने विहिरीत ढकलून देताच त्या आतमध्ये पडल्या. यावेळी त्यांची आरडाओरड आयकून बाजूला असलेल्या गावातील इतर लोकांनी तात्काळ विहिरीजवळ धाव घेतली. त्यानंतर काहींनी विहिरीत उडी मारून पल्लवी ताबारे यांचा जीव वाचवत त्यांना बाहेर काढले. त्यामुळे मोती दुर्घटना टळली आहे. 

इस्लापूर वन विभागाला अनेक वेळा या वानरांचा बंदोबस्त करा असे ग्रामपंचायतने ठराव दिलाय. मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने इस्लापुरकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान या माकडांच्या हल्ल्यात लहान मुलं व अनेक महिला आतापर्यंत जखमी झाल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने तात्काळ या वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा इस्लापूर येथील वन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय.

भीतीचे वातावरण... 

किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात गेल्या काही दिवसांपासून वानरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अनेकदा हे वानर टोळीने येऊन गावकऱ्यांवर हल्ला करतात. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे  वातावरण आहे. तर हातात लाठ्या-काठ्या घेऊन घराबाहेर निघण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.  

महत्वाच्या बातम्या...

Congress : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीरच्या 64 नेत्यांचा राजीनामा

Mumbai Crime : मुंबईतील एका कॉल सेंटरवर छापा, गुन्हे शाखेकडून 17 महिलांची सुटका, मालकाला अटक

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Laxman Hake: मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी

व्हिडीओ

Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तरूणीचं तोंड दाबलं, चार्जरची केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीने गळा आवळला; सुरतमध्ये 22 वर्षीय इंजिनिअरला क्रूरपणे संपवलं, 60 पोलीसांची टीम पण पुरावा मिळेना
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Laxman Hake: मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
Sandeep Deshpande : गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला
गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला "फेकू " कोण? मनसेच्या संदीप देशपांडेंची डिवचणारी पोस्ट
BJP vs MNS: राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
Maratha Reservation : वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली
वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली
Embed widget