एक्स्प्लोर

Nanded News : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नावाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे नांदेडमध्ये बॅनर झळकले, चर्चा मात्र राजकीय डावाची!

Ashok Chavan Banner On Ram Mandir Inauguration :  अशोक चव्हाण यांनी बॅनरवर स्वतः चे नाव त्यांनी त्यावर टाकले असून माजी मुख्यमंत्री पदाचा किंवा काँग्रेसच्या कुठल्याही पदाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चर्चाना उधाण आलेलं आहे.

Ashok Chavan :  अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळा काही तासांवर आला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी बॅनर झळकावले जात आहेत. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरला आहे. रघुपती राघव राजाराम असे लिहून चव्हाण यांनी नांदेड शहरात बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे स्वतः चे फक्त नाव त्यांनी त्यावर टाकले असून माजी मुख्यमंत्री पदाचा किंवा काँग्रेसच्या कुठल्याही पदाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चर्चाना उधाण आलेलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा अनेकांनी केला होता. त्यातच आज हे बॅनर पहायला मिळाल्याने पुन्हा चर्चांना उधाण  आले आहे. एरव्ही सत्य साईबाबांचे भक्त असलेले चव्हाण फारसे देव धर्माच्या बाबतीत फारसे सक्रिय नसतात. मात्र अयोध्येच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी केलेली बॅनरबाजी राजकारणात उलथापालथ घडवणारी ठरते की काय अशी चर्चा रंगली आहे. 

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते गिरीश महाजन यांनी 15 दिवसात राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडून कोणत्याही पदाच्या उल्लेखाशिवाय बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

अशोक चव्हाण यांच्या बॅनरमध्ये नेमकं आहे तरी काय?

अशोक चव्हाण यांच्याकडून  नांदेडमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो आहे. तर, त्यासोबत रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान  या महात्मा गांधी यांच्या भजनातील ओळी नमूद करण्यात आल्या आहेत. तर, बॅनरवर अशोक शंकरराव चव्हाण हे एकमेव नाव नमूद करण्यात आले आहे. या नावाखाली कोणत्याही पदाचा उल्लेख नाही. अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नावानंतर कोणत्याही पदाचा उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Nanded News :  काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नावाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे नांदेडमध्ये बॅनर झळकले, चर्चा मात्र राजकीय डावाची!

राज्यात ठिकठिकाणी रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले जात आहेत. या बॅनरवर नेत्यांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची गर्दी सर्वाधिक दिसते. तर, त्या तुलनेत अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर प्रभू राम वगळता इतर कोणाचाही फोटो नाही. त्यामुळेही अशोक चव्हाण यांच्या बॅनरची चर्चा सुरू आहे.    

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget