नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 6 दिवसांत काय झालं?; बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेत हल्लाबोल केला.
नागपूर : राज्यातील महायुती सरकारच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता आज होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मंत्र्यांचे खातेवाटप अद्यापही झाले नाही. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अधिवेशनात आमदार व विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण होणार आहे. नागपूरमधील (Nagpur)सहा दिवसांच्या अधिवेशनात सर्वाधिक चर्चाही बीड आणि परभणी घटनेवर झाली कायदा सुव्यवस्था संदर्भात पहिल्या दिवशीच सोमवारपासून विरोधकांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात केली होती बीड (Beed) परभणी घटनेवरती अनेकदा सभागृहाच्या बाहेर आंदोलन झाली आणि सभागृहात 101 अन्वे चर्चा करून आणली. या चर्चेवरती भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत वाल्मीक कराड आणि एक मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. तर, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणावरुनही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेत हल्लाबोल केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावरती उत्तर देताना बीड प्रकरणांमध्ये एसपींची बदली केली आणि न्यायालय आणि आयजी अंतर्गत चौकशी समिती गठित केल्याची घोषणा केली. परभणी प्रकरणावरही चौकशी समिती गठीत केली, या दोन ही घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना अर्थिक मदतीची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अमित शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सभागृहात त्याचे पडसाद उमटले, विरोधकांनी निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोर्चा काढत विधानभवनातही सर्व विरोधकांनी जय भीमचा नारा देत मोठ आंदोलन पायऱ्यांवरती केलं.
विदर्भावर चर्चा झालीच नाही
कापसाला योग्य भाव नाही म्हणून एक दिवस सहभागृच्या बाहेर विरोधकांनी पायऱ्यावरती आंदोलन केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करतांना पीक विमा संदर्भात सुरेश धस यांनी महायुतीला घरचा आहेर देत तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. काही महत्त्वाची विधेयक मांडली गेली, त्यामध्ये जन सुरक्षा विधेयक यावरती चर्चा करण्यात आली. कारगृह सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. ही सर्व चर्चा झाली असली तरी विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भावरती मात्र वेगळी चर्चा करण्यात आली नाही. अंतिम आठवडा प्रस्तावमध्ये विदर्भ संदर्भात अवघ्या दोन ओळींचा उल्लेख करण्यात आला आहे.
या अधिवेशनामध्ये सर्वाधिक बोलायला नवीन आमदारांना संधी देण्यात आली. नवीन आमदारांनी सर्वाधिक औचित्याच्या मुद्द्यावरती प्रश्न उपस्थित केले. सोबतच राज्यपालांचे अभिभाषण आणि 293 च्या अन्वेय चर्चावरती आपली मत मांडली. बीड व परभणीच्या आमदारांनी आपली भूमिका सर्वाधिक मांडली.
हेही वाचा
गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली; महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप