एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vidarbha Unseasonal Rain : विदर्भाला सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं; हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांचं नुकसान

Vidarbha Weather Update: विदर्भात सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

Vidarbha Weather Update : राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीटीने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. विदर्भात सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकाऱ्यांच्या शेतपिकांचेही मोठे नुकसान केले असून सर्वत्र एकच दाणादाण उडाली असल्याचे चित्र आहे. आज सलग पाचव्या दिवशी देखील विदर्भातील नागपूर, बुलढाणा, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ वाशिमसह इतरही पावसाची रिपरिप कायम आहे. तर पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

अवकाळी पावसाचा हाहाकार

विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सलग पाचव्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. भर उन्हाळ्यात सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने अक्षरक्ष: शेतकाऱ्यांची दाणादाण उडवली आहे. अशातच दोन दिवस झालेल्या दमदार अवकाळी पावसामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यात तब्बल 55 हजार 596 हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झाले आहे. तर 1566 घराची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. तर दुसरीकडे विदर्भातील अकोला, वर्धा, वाशिम, बुलढाणासह इतरत्रही आज दमदार पावसासह विजांचा कडकडाट आणि  30-60 प्रति तास सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळाला आहे. सोबतच अवकाळी पावसामुळे विदर्भातील तापमानात देखील मोठे बदल झाले असून उष्णतेच्या पाऱ्यात मोठी घट झाली आहे.

तर दुसरीकडे या अवकळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना झाल्याचेही चित्र आहे. आज बुलढाण्यातील अनेक भागात सलग  वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि  तुफान गारपीट झाली आहे. यात जिल्ह्यातल्या मेहकर , मोताळा तालुक्यात गारपीटीमुळे शेतमालाचे मोठ नुकसान झाले आहे. यात संत्रा, तीळ, लिंबू, गहू, ज्वारी, भाजीपाला, केळी, आंबा आणि पपईचा समावेश आहे. 

गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

सलग 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधीक फटका सडक अर्जुनी तालुक्याला बसला असुन पिपरी परिसरात वादळी वारा आणि पाऊस झाल्याने मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 5 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात वादळी पाऊस आल्याने शेतात उभे असलेले मका पीक जमीनदोस्त झाले. याबरोबरच इतर फळभाज्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हा पाऊस पडला आहे. 

भंडाऱ्यात सलग पाचव्या दिवशी अवकाळीचे सत्र

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात देखील मागील पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठं सतत रिपरिप सुरू आहे. आज पाचव्या दिवशीही सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झालेली आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात पिकाची लागवड केली जाते. हा पाऊस भात पिकासाठी नवसंजीवनी ठरला आहे. यासोबतच बागायती शेतीला या पावसाचा फायदा झाला आहे. प्रखर उष्णतेमुळे प्रचंड उकडा  निर्माण झाला होता. मात्र, आता पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळं ऐन उन्हाळ्यातच आता नागरिकांना छत्र्या आणि उबदार कपडे वापरावे लागत आहेत.

नुकसान झालेल्या भागात उमेदवारांची धावपळ

सलग चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, वादळीवारे आणि गारपीट होत आहे.  यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात शेतकरी विवंचनेत सापडला असून त्याला दिलासा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेले सर्व नेते गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, शेतकरी नेते रविकांत तुपकर इत्यादि नेते हे मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले असून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget