Heat Wave : सावधान! विदर्भातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; अकोला ठरली आज सर्वाधिक 'हॉट सीटी'
Heat Wave in Vidarbha : आज विदर्भात सर्वाधिक तापमान हे अकोला येथे 43.9 अंश सेल्सिअस असल्याचे नोंदविण्यात आले आहे. 2024 या वर्षातले हे सर्वाधिक कमाल तापमान असल्याचेही गणल्या गेले आहे.
Vidarbha Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 15 दिवसांपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) चांगलंच झोडपून काढलं आहे, तर कुठे उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने अक्षरक्ष: कहर केला असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतलाय. अशातच आता अवकाळी पावसाचे ढग ओसारल्यानंतर विदर्भात (Vidarbha) पुन्हा उष्णतेची लाट (Heat Wave) पसरल्याचे बघायला मिळत आहे. आज गोंदिया जिल्हा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडली आहे. तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान हे अकोला (Akola) येथे 43.9 अंश सेल्सिअस असल्याचे नोंदविण्यात आले आहे. 2024 या वर्षातले हे सर्वाधिक कमाल तापमान असल्याचेही गणल्या गेले आहे.
अकोल्यात उष्णतेचा पार 43.9 अंश सेल्सिअसवर
महाराष्ट्रासह विदर्भात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. आजही विदर्भ, मराठवाड्यातसह इतर अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. आज अकोल्यात सर्वाधिक 43.9 अंश सेल्सिअस कामल तापमानाची नोंद झाली आहे. तर त्या खलोखाल अमरावती, चंद्रपुर येथे 42.8 अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक कमी किमान तापमान हे नागपूर जिल्ह्याचे 22.8 अंश सेल्सिअस इतके गणल्या गेले आहे. तर आगामी काळत विदर्भातील कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशाराही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. तर पुढील 3 ते 5 मे दरम्यान विदर्भातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भात येत्या काही दिवसात कमाल तापमानात मोठे बदल होणार असल्याच्या इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. पुढील 3 मे पासून विदर्भात उष्णतेची लाट येणार असून त्यात चंद्रपूर आणि अकोला या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 4 मेला ही लाट कायम असून त्यानंतर 5 मेला केवळ अकोल्याला हा यलो अलर्ट असणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असे आहे विदर्भाचे आजचे तापमान
जिल्हे | कमाल | किमान |
अकोला | 43.9 | 26.2 |
अमरावती | 42.8 | 25.1 |
बुलढाणा | 40.5 | 27.6 |
ब्रम्हपुरी | 42. 2 | 26.5 |
चंद्रपूर | 42.8 | 25.4 |
गडचिरोली | 42.4 | 25.4 |
गोंदिया | 39.00 | 23.4 |
नागपूर | 41.4 | 22.8 |
वर्धा | 42.5 | 25.4 |
वाशिम | 42.4 | 24.4 |
यवतमाळ | 40.00 | 25.1 |
इतर महत्वाच्या बातम्या