(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray: 'राज ठाकरेंचा ताफा अडवला तर…', विदर्भ दौऱ्यावरती जाण्याआधीच ‘मनसे’कडून इशारा, पोलिसांना दिलं निवेदन
Raj Thackeray: राजकीय नेत्यांच्या गाडी अडवण्याच्या आणि विरोधात घोषणा देण्याच्या घटनेनंतर राजकारण चांगलच तापल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाण्याआधी मनसैनिकांनी पोलिसांना निवेदन देत ठाकरे गटाला इशार दिला आहे.
Raj Thackeray Vidarbha visit: राजकीय नेत्यांच्या गाडी अडवण्याच्या आणि विरोधात घोषणा देण्याच्या घटनेनंतर राजकारण चांगलच तापल्याचं दिसून आलं आहे मराठवाड्यात राज ठाकरेंचा (Raj Thackeray) दौरा असताना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राज यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या, त्यावेळी सुपारीबाज अशा घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या. आता येत्या 21 तारखेपासून राज ठाकरे (Raj Thackeray) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दौरे, बैठका, यात्रा, भेटीगाठी यांना वेग आला आहे. अशातच या घटनांमुळे आता पक्षाकडूनच खबरदारीचा उपाय म्हणून निवेदन देण्यात येत आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेला घेऊन नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक आठवड्याच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहे. या निमित्त सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या दौऱ्यात मराठवाड्यासारखे निषेधाचे काही प्रकार घडले तर आम्ही विरोधकांना जशास तसे उत्तर देऊन असा इशारा मनसे सैनिकांनी दिला आहे. कायदा सुव्यवस्थेचा काही प्रकार घडला तर याला पूर्णतः पोलीस यंत्रणा जबाबदार असेल असे मनसेच्यावतीने पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले आहे.
मनसेचे भंडारा संपर्क अध्यक्ष मनदीप रोडे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यात जो अडथळा आणेल, तो घरी परत जाणार नाही, असा सज्जड दम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि इतरांना दिला आहे. जो कोणी या दौऱ्यादरम्यान धुळघुस घालण्याचा प्रयत्न करेल त्याचा चांगलाच समाचार घालेल जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
असा असेल मनसेचा विदर्भ दौरा
20 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून नागपूरला रेल्वेने रवाना होतील.
21 ऑगस्ट रोजी मतदारसंघ निहाय्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
22 ऑगस्ट रोजी नागपूर ते भंडारा, भंडारा ते गोंदिया येथे निरीक्षक व पदाधिकारी यांचे बैठक घेतील.
23 ऑगस्टला गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर येथे निरीक्षक पदाधिकारी यांचे बैठक घेतील.
24 ऑगस्टला वणी ते वर्धा असा दौरा असेल.
25 ऑगस्ट ला अमरावती ते वाशिम असा दौरा राज ठाकरे करतील.
26, 27 ऑगस्टला अकोला बुलढाणा असा हा दौरा असेल.
विदर्भ दौऱ्यातही उमेदवारांची घोषणा?
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे. तर राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या राज्यभरात दौरा करत आहेत. मनसेने आतापर्यंत चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) हे मराठवाडा दौऱ्यावर असताना आपल्या चार उमेदवारांची घोषणा ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी केलीय. त्यामुळे आगामी विदर्भ दौऱ्यात देखील काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा - राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर तो परत घरी जाणार नाही; मनसेच्या नेत्याचं ठाकरे गटाला इशारा