राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर तो परत घरी जाणार नाही; मनसेच्या नेत्याचं ठाकरे गटाला इशारा
Gondia-Bhandra Election 2024 : राज ठाकरेंच्या दौऱ्यात जो कुणी अडथळा आणेल, तो घरी परत जाणार नाही, असा सज्जड दम मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि इतरांना दिला आहे.
![राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर तो परत घरी जाणार नाही; मनसेच्या नेत्याचं ठाकरे गटाला इशारा mns president raj thackeray on vidarbha tour MNS leader s warning to Thackeray group shivsena tour is interrupted he will not go back home maharashtra marathi news राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर तो परत घरी जाणार नाही; मनसेच्या नेत्याचं ठाकरे गटाला इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/13/81bf6af50b76ae73903cc9ecdb9245b51723540795682892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics भंडारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आता 20 ऑगस्टपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते भंडारा जिल्ह्यातही येणार असून त्या अनुषंगानं भंडाऱ्याच्या मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे भंडारा संपर्क अध्यक्ष मनदीप रोडे यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यात जो अडथळा आणेल, तो घरी परत जाणार नाही, असा सज्जड दम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि इतरांना दिला आहे. जो कोणी या दौऱ्यादरम्यान धुळघुस घालण्याचा प्रयत्न करेल त्याचा चांगलाच समाचार घालेल जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विधानसभेसाठी विदर्भातही मनसे शड्डू ठोकणार का?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे चांगलीच तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. नुकताच मराठवाडा दौरा राज ठाकरे यांनी केलाय. यानंतर आता मनसे अध्यक्ष विदर्भ दौरा करणार आहे. मराठवाड्यानंतर राज ठाकरे हे येत्या 20 ऑगस्टपासून विदर्भाच्या दौरावर असेल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी विदर्भात मनसे शड्डू ठोकणार का? याकडे आता सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विदर्भदौऱ्यातही उमेदवारांची घोषणा होणार?
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच जागांवर मनसे तयारी करत आहे. यासाठी मनसे नेत्यांनी सर्व जागांची चाचपणी करून या संदर्भात मनसे अध्यक्ष यांना आढावा देखील दिलेला आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा राज्यभर दौरा होतोय. दरम्यान, मनसेने आतापर्यंत चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असताना आपल्या चार उमेदवारांची घोषणा ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी केलीय. त्यामुळे आगामी विदर्भ दौऱ्यात देखील काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
असा असेल मनसेचा विदर्भ दौरा
20 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून नागपूरला रेल्वेने रवाना होतील.
21 ऑगस्ट रोजी मतदारसंघ निहाय्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
22 ऑगस्ट रोजी नागपूर ते भंडारा, भंडारा ते गोंदिया येथे निरीक्षक व पदाधिकारी यांचे बैठक घेतील.
23 ऑगस्टला गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर येथे निरीक्षक पदाधिकारी यांचे बैठक घेतील.
24 ऑगस्टला वणी ते वर्धा असा दौरा असेल.
25 ऑगस्ट ला अमरावती ते वाशिम असा दौरा राज ठाकरे करतील.
26, 27 ऑगस्टला अकोला बुलढाणा असा हा दौरा असेल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)