एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vidarbha Activists : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा, विदर्भ आणि वीज दराबाबत आक्रमक

Nagpur News : नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर यांच्या घराबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. 

Nagpur Vidarbha Activists Protest : ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आज विदर्भवादी कार्यकर्त्यांनी (Vidarbha Activists) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर यांच्या घराबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर काही विदर्भवादी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फडणवीस यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विदर्भावादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं येथे पाहायला मिळत आहे.

फडणवीसांच्या घराबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा

विदर्भवादी आंदोलकांना वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरात अडवण्यात आलं आहे. संविधान चौकापासून आंदोलकांचा लाँग मार्च सुरु झाला. सुरुवातीला मोर्चा शांततेनं निघाला होता, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यावर आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलक पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स ओलांडून फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, पोलिसांना काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. (Nagpur Vidarbha Activists Protest)

विदर्भ राज्य आणि वीज दरासंदर्भात विदर्भवादी आक्रमक

वेगळं विदर्भ राज्य ही विदर्भवादी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच विज दरवाढीसाह इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. विदर्भामध्ये काही जुने औष्णिक वीज प्रकल्प आहेत, त्यासोबतच नव्यानेही प्लांट उभारले जात आहेत. मात्र, विदर्भातील जनतेला त्याचा कोणताही फायदा होत नाही. विदर्भातील जनतेला वीज दरात सूट देण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. उलट औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भवाद्यांचा विरोध आहे.

पाहा व्हिडीओ : विदर्भवादी कार्यकर्त्यांचं देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

फडणवीस यांच्या निवास्थानच्या पोलीस सुरक्षेत वाढ

विदर्भवाद्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने आज विदर्भवादी वीज दरवाढ आणि अन्न धान्यावरील जीएसटीच्या विरोधात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरावर लाँगमार्च काढण्यात आला.  संविधान चौकातून विदर्भवाद्यांच्या या लाँग मार्चला सुरुवात झाली आणि धरमपेठ येथील निवास्थानवर मोर्चा पुकारण्यात आला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संविधान चौक आणि धरमपेठ भागात पोलीस बंदोबस्त वाढवला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amravati News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक, विभागीय कार्यालयावर जन एल्गार मोर्चा; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget