एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
या दौऱ्यात पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असणार आहेत.
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदींच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहेत. शिवाय ते दोन जाहीर सभांनादेखील संबोधित करणार आहेत.
नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता नागपूरला पोहोचतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडाला रवाना होतील. पांढरकवडा येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदी जळगावला रवाना होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असणार आहेत.
दिवसभरातील कार्यक्रम
- नांदेडमधील एकलव्य आदर्श विद्यालयाचं उद्घाटन
- नागपूर-पुणे ट्रेनला व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.
- महिला स्वयंसहायता समूहातील सदस्यांना प्रमाणपत्र व धनादेश वाटप. यातील सुमारे 25 महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधणार. यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
- धुळे येथे लोअर पंजारा मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना आणि अमृत योजनेचे भूमिपूजन.
- धुळे-मनमाड रेल्वे मार्ग आणि जळगाव-मनमाड या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन.
- भुसावळ-वांद्रे एक्सप्रेस ट्रेनला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.
- जळगाव-उधना दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे उद्घाटन.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement