एक्स्प्लोर

Nagpur Central Jail : डोंगर पोखरुन, उंदीर काढला, तब्बल साडे तीनशे पोलीसांनी टाकलेल्या धाडीत फक्त पाच ग्राम गांजा जप्त

अद्यावत यंत्रांचा वापर करून भिंतीत/जमिनीत लपवलेले मोबाईल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एवढ्या प्रयत्नानंतर ही पोलिसांच्या हाती फक्त पाच ग्राम गांजा लागला आहे, हे विशेष.

नागपूरः मोक्काचा आरोपी कारागृहात गांजा आणि मोबाइलची बॅटरी घेऊन जाताना आढळ्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून प्रकरणाला गांभीर्याने घेत तब्बल 350 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात सर्च ऑपरेशन केले. मात्र एवढ्या मोठया सर्च ऑपरेशननंतर पोलिसांच्या हाती फक्त 5 ग्राम गांजा आला आहे. त्यामुळे या कारवाईत पोलीसांनी 'खोदा पहाड़, निकला चूहा' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

थेट सेंट्रल जेलमध्येच अशा पद्धतीने अमली पदार्थ आणि मोबाईल पोहोचत असल्याचे उघड झाल्यानंतर आज पहाटे नागपूर पोलिसांनी नागपूर सेंट्रल जेलवर आजवरची सर्वात मोठी कारवाई करत साडेतीनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्च ऑपरेशन राबवला. त्यात अद्यावत यंत्रांचा वापर करून भिंतीत किंवा जमिनीत लपवलेले मोबाईल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एवढ्या प्रयत्नानंतर ही पोलिसांच्या हाती फक्त पाच ग्राम गांजा लागला आहे, हे विशेष.

कैद्यांना पूर्व कल्पना?

जेलमधील गुन्हेगारांना, कैद्यांना पोलीस धाड मारतील याची माहिती आधीच मिळाली होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच जेलमध्ये बंद असलेल्या गुन्हेगारांचा नेटवर्क पोलिसांपेक्षा भारी असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

सहा जणांना अटक, दोघे निलंबित

या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच कोर्टात घेऊन गेलेल्या दोघा कर्मचाऱ्यांनाही निलंबन करुन त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यात एक निलंबित पोलीस उपनिरीक्षक सूत्रधार असून त्याने मोबाइल-गांजा आणण्यासाठी आरोपीच्या भावाला पैसे दिले होते. 

आरोपी सेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी

मोक्कामध्ये 2019 पासून कारागृहात बंद खापरखेडाचा चर्चित गुंड सूरज कन्हैयालाल कावळे न्यायालयात पेशीनंतर कारागृहात परतला असता त्याच्याजवळ 51 ग्रॅम गांजा आणि 15 मोबाईल बॅटरी आढळल्या आणि शहर पोलिसात एकच खळबळ उडाली. सूरजने फाईलच्या फोल्डरमध्ये पानात लपवून हा माल आणला होता. मात्र कारागृह रक्षकांना संशय आल्याने तो पकडल्या गेला. मोक्काच्या आरोपीला कडेकोट सुरक्षेत कोर्टात पेशीसाठी हजर केले जाते. अशात त्याला गांजा आणि फोनच्या बॅटरींची फाईल कोणी आणि केव्हा दिली हा मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कोर्टात कोणी घेतली भेट?

कारागृहातून आरोपींना न्यायालयात पेशीसाठी घेऊन जाणे आणि परत कारागृहात पोहोचविण्याची जबाबदारी आरोपी सेलची असते. त्यासाठी विशेष पथक बनविण्यात आले आहे. मोक्काच्या आरोपींसोबत तर सशस्त्र पोलिस तैनात केले जातात. मोक्का न्यायालयाच्या आसपासही कडेकोट सुरक्षा असते. अशात सूरजला कोण-कोण भेटला. कोणी त्याच्या हातात कागदपत्रांचे फोल्डर दिले. जेव्हा त्याला कागदपत्र देण्यात आले तेव्हा त्यांची तपासणी झाली किंवा नाही. या सर्व मुद्द्यांवर पुढील तपास होणार आहे. प्रकरणात आरोपी सेलच्या कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. आरोपी सूरजसोबत तैनात कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरु आहे.

15 बॅटरी तर मोबाईल कुठे ?

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, आरोपीजवळ मोबाईलच्या 15 बॅटरी मिळाल्या, मोबाईल नव्हते. मोबाईलशिवाय केवळ बॅटरी काय कामाच्या. यावरून स्पष्ट आहे की, कारागृहात एकतर आधीच मोबाईल फोन आहेत किंवा आरोपी भविष्यात बॅटरींप्रमाणेच मोबाईलही घेऊन जाणार होता. बॅटरी विना मोबाईल काहीच कामाच्या नाहीत. अशात कारागृहात आधीपासूनच तर मोबाईल उपलब्ध नाहीत ना, याचा तपास कारागृह प्रशासन करीत आहे. मात्र या घटनेने कारागृहाच्या बाहेर आणि आतमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहेत. यापूर्वीही नागपूर मध्यवर्ती कारागृह संपूर्ण देशात अशाच कारणांमुळे बदनाम झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Senate Elections : कुलगुरूंच्या आदेशाला स्थगिती, याचिकाकर्त्याचे नामांकन स्वीकार करा, हायकोर्टाचे निदेंश

High Court : अकृषक जमिनीच्या सेसवरील 71 वर्षे जुना वाद अखेर निकाली, सेस वसुलीवर 4 महिन्यांची स्थगिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget