Senate Elections : कुलगुरूंच्या आदेशाला स्थगिती, याचिकाकर्त्याचे नामांकन स्वीकार करा, हायकोर्टाचे निदेंश
याचिकेत कुलगुरूंच्या आदेशालाही आव्हान देण्यात आले. त्यामुळे कुलपतींकडे अपील करण्याचा अर्थच उरत नाही. यावर न्यायालयाने असलेल्या अधिकाराचा वापर करीत याचिकेवर सुनावणी करीत असल्याचे सांगितले.
नागपूर: एकाच व्यक्तीने दोन उमेदवारांच्या नामांकन अर्जावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केल्याने कुलगुरूंनी एका उमेदवाराचे नामांकन अर्ज रद्द केले. याविरुद्ध उत्तमचंद कांबळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होते. याप्रकरणी सुनावणी करताना न्या. अविनाश घारोटे यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या 10 ऑगस्ट, 2022च्या नामांकन पत्र रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. सोबतच, याचिकाकर्त्यास (petitioner) दिलासा देताना गोंडवाना विद्यापीठाच्या (Gondwana University) कुलगुरूंनी 17 ऑगस्ट, 2022रोजी दिलेल्या आदेशालाही स्थगिती दिली. एवढेच नव्हे तर याचिकाकर्त्याचा नामांकन अर्ज स्वीकार करीत उमेदवार यादीत समावेश करण्याचे निदेंश दिले. निवडणूक अधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज रद्द केल्यानंतर याचिकार्त्याने कुलगुरूपुढे अपील केली होती. कुलगुरूंनीही (Vice Chancellor) याचिकार्त्याची अपील फेटाळली.त्यानंतर याचिकार्त्याने न्यायालयात धाव घेतली होती.
कोणताही मतदार होऊ शकतो तीन उमेदवारांचा प्रस्तावक
याचिकाकर्त्याच्या वकिलाने कुलसचिवांनी (Registrar) जारी केलेल्या अटीत एकापेक्षा जास्त व्यक्तीने प्रस्तावाचे समर्थन केल्यावर बंदी नसल्याचे म्हटले आहे. नियमानुसार कॉलेजीयम ऑफ युनिवसिंटी टीचर्सतफें 3 जणांना निवडले जाते. त्यानुसार कोणताही मतदार 3 उमेदवाराचा प्रस्तावक (Proposer) होऊ शकतो. प्रतिवादींतफें खुला प्रवर्ग, एससी-एसटी आणि एनटी वा ओबीसी प्रवर्गासाठी वेगवेगळया श्रेणीत निवडणूक क्षेत्राचे विभाजन करण्यात आल्याचे सांगितले.याशिवाय, तीन श्रेणीलाही वेगवेगवळया वर्गात विभाजीत करण्यात आले. त्यानुसार एकपेक्षा जास्त उमेदवारांचे प्रस्तावक होता येत नसल्याची माहिती न्यायालयापुढे दिली. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार (As per Maharashtra University Act) ही अट ठरविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यावर आक्षेप असल्यास कुलपतींकडे अपील करण्याची संधी. त्यामुळे याचिका विचारात घेऊ नये, अशी विनंती न्यायालयापुढे करण्यात आली.
एका जागेचे प्रकरण नाही
सुनावणीत न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्याच्या आदेशाला आव्हान दिल्यानंतर कुलगुरूंकडे अपील करण्यात आल्याचा पर्याय निवडल्याचे सांगितले. याचिकेत कुलगुरूंच्या आदेशालाही आव्हान देण्यात आले. त्यामुळे कुलपतींकडे अपील करण्याचा अर्थच उरत नाही. यावर न्यायालयाने असलेल्या अधिकाराचा वापर करीत याचिकेवर सुनावणी करीत असल्याचे सांगितले. वेगवेगळया वर्गातील वेगवेगळया जागांसाठीची ही निवडणूक आहे. कुठल्याही एका जागेसाठी नाही. त्यामुळे वेगवेगळया जागेसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराचे पहिला व दुसरा प्रस्तावक बनू शकतो. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करीत 29 सप्टेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या