11th Admission: अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी उद्यापासून, दुसऱ्या फेरीअखेर 20,587 जागांवर प्रवेश
अकरावी प्रवेशासाठी उद्यापासून तिन दिवस तिसऱ्या फेरीअंतर्गत प्रवेश घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीअखेर 35,213 जागा रिक्त असून प्रवेशासाठी तिसरी व खुली प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे.
नागपूरः महानगर पालिका क्षेत्रातील इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत उद्या, सोमवारपासून तिसरी फेरी सुरु होत आहे. 22,23 आणि 24 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणार असल्याचा अंदाज पहिल्या दोन फेरीतून दिसून येत आहे.
दुसरी प्रवेश फेरीअखेर 20,587 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या फेरीअखेर 35,213 जागा रिक्त असून प्रवेशासाठी तिसरी व खुली प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. मात्र या दोन्ही फेरीअखेर सुमारे 5000 प्रवेश होतील तरी देखील कॅपमधील 11वीच्या तब्बल 30,000 जागा रिक्त राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
पहिल्या फेरीत कॅपचे 13.595 व आणि कोट्यामधून 986 असे एकूण 14,581 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. दुसरी फेरी 12 ते 17 ऑगस्टदरम्यान चालली. यावेळी कॅप राउंडचे 3249 आणि कोट्यातील 1184 असे 4433 प्रवेश पूर्ण झाले. आतापर्यंत 20,587 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. शहरात केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत 55,800 जागा असून त्यातील 35,213 जागा अद्याप रिक्त आहेत. तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या फेरीत 3000 व खुल्या राउंडमध्ये 2000 प्रवेश होतील. तरी देखील 30,000 जागा रिक्त राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीही 25,000 जागा रिक्त होत्या.
तंत्र शिक्षणाकडे वाढला कल
मागील काही वर्षांच्या तुलनेत मागील वर्षीपासून रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षणाला महत्त्व आले आहे. त्यामुळे फार्मसी, आयटीआय आणि पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. यावर्षी आयटीआयमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले आहेत तर पॉलिटेक्निकमध्ये नवे अभ्यासक्रम आल्याने व अभियांत्रिकीच्या बेसिक शिक्षणांची मागणी वाढल्याने विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
Amravati : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा लवकरच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
शाखा | जागा | प्रवेश | रिक्त |
कला | 8500 | 2530 | 6130 |
वाणिज्य | 16650 | 5,814 | 10,906 |
विज्ञान | 26350 | 11,266 | 15,244 |
एमसीव्हीसी | 3910 | 977 | 2,933 |
Train Cancelled : 62 रेल्वेगाड्या रद्द, 31 ऑगस्टपर्यंत प्रवाशांचे होणार हाल
महाविद्यालयात प्रवेशासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयात पदवी प्रवेशासाठी 8 जूनपासून प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार 1 ऑगस्टपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत होती. मात्र, बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने व विद्यापीठाकडे मागणी केल्याने विद्यापीठाने पदवी प्रवेशासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI