एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कन्हानमध्ये शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकूने भोसकून हत्या
नागपूर जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेची, तर उद्या कन्हान नगर परिषदेची निवडणूक होत असताना कन्हान नगर परिषदेच्या एका शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
नागपूर : जिल्ह्यात आज(7 जानेवारी) नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. तर उद्या कन्हान नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. अशातच कन्हान नगर परिषदेच्या एका शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये काल मध्यरात्री ही घटना घडली आहे.
कन्हान नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 9 जानेवारीला होत आहे. प्रचार संपल्यानंतर काल रात्री प्रभाग 8 चे शिवसेना उमेदवार डायनल शेंडे यांचे नातेवाईक संजू खडसे रात्री एका बारमध्ये मद्यपान करत होते. त्याचवेळी बाजूच्या टेबलवर बसलेल्या एका व्यक्तीचा ग्लास या तिघांपैकी एकाच्या अंगावर पडला. यातून वाद झाल्याने त्यांच्यात धक्काबुक्की झाली. दरम्यान, बारमधील लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. मात्र, थोड्या वेळाने बारच्या बाहेर आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी तिघांनी संजू खडसे यांच्यावर चाकूने वार करुन घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजू खडसे यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.
निवडणूक वादाची किनार -
आज नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. तर उद्या कन्हान नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. काही दिवसांपासून नागपूर जिल्हा आणि विशेषतः कन्हानमध्ये निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला होता. परिणामी प्रचारावेळी अनेकदा विरोधकांचा सामना झाला होता. सध्या राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे ही घटना निवडणूक प्रचारातील वादाशी संबंधित नाही ना? असा चर्चा कन्हान होत आहे. मात्र, प्राथमिक दृष्ट्या, असं दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तीन आरोपी अटकेत -
सोमवारी रात्री संजू खडसे यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली. दरम्यान, कन्हान नगर परिषदेवर भाजपची सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रचार झाला आहे.
संबंधित बातमी - नामांकित शाळेच्या बसचं स्टेअरिंग गुन्हेगारांच्या हाती, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
Bus Driver | नामांकित स्कुल बसचा चालक सराईत गुन्हेगार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement