एक्स्प्लोर
Advertisement
नामांकित शाळेच्या बसचं स्टेअरिंग गुन्हेगारांच्या हाती, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला हा कोणी भुरटा चोर नसून एटीएम फोडणारा अट्टल गुन्हेगार आहे. जगदीश बाभरे नावाच्या या चोराने 2015 पासून आजवर 7 एटीएम फोडून विविध बँकांची 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड लंपास केली आहे. अनेक दिवस शोध घेऊन सापळा रचून पोलिसांनी जगदीशला अटक तर केली.
नागपूर : नागपूरात एका नामांकित शाळेने त्यांच्या शाळेतील बसची स्टेअरिंग चक्क एका सराईत चोराच्या हातात सोपविली होती. 7 एटीएम फोडून लाखो रुपये लंपास करणारा हा अट्टल चोर रोज चिमुकल्यांना शाळेत ने आण करायचा आणि रात्री चोऱ्या करायचा. पोलिसांनी अटक केल्यावर शाळेने हात झटकत शाळेच्या ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टरवर खापर फोडले.
नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला हा कोणी भुरटा चोर नसून एटीएम फोडणारा अट्टल गुन्हेगार आहे. जगदीश बाभरे नावाच्या या चोराने 2015 पासून आजवर 7 एटीएम फोडून विविध बँकांची 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड लंपास केली आहे. अनेक दिवस शोध घेऊन सापळा रचून पोलिसांनी जगदीशला अटक तर केली. मात्र, अटकेवेळी त्याचे व्यवसाय पाहून पोलीसही हादरले. कारण एटीएम फोडण्यात सराईत असलेला आणि लाखो रुपयांची रोकड सहज पळवणारा जगदीश नागपूरच्या एका नामांकित शाळेत स्कूल बसचा चालक झाला होता. रोज तो शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून शाळेत ने आण करायचा. संबंधित शाळेच्या ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टरने जगदीशची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता कामावर ठेवले होते. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी जगदीश ही स्कूल बस चालवून सर्वांच्या नजरेत धूळ फेकत होता.
पोलिसांनी अटक केल्यानंतर आतापर्यंत जगदीशने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशात 7 एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे. आपण एका अट्टल गुन्हेगाराच्या हातात लहान मुलांना सोपविल्याचे लक्षात आल्यानंतर शाळेने मौन बाळगत शाळेच्या ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्टरकडे बोट दाखविले आहे. कोणतही पोलीस व्हेरिफिकेशन न करता जगदीशला नोकरी दिल्यामुळे अशी चूक झाल्याची कबुली ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टरने दिली आहे.
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर नागपुरातील सर्वच शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना धक्काच बसला आहे. शाळेवर विश्वास ठेवून आम्ही आमची मुले स्कूल बसने पाठवितो. मात्र शाळा जर त्यांची जबाबदारी झटकून ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टरवर जबाबदारी ढकलणार असतील तर शाळांनी पालकांकडून हजारो रुपये फी का वसूल करावी असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
JNU Violence | जेएनयूमधील हल्ला उत्तम कायदा-सुव्यवस्थेचं लक्षण नाही : संजय राऊत | ABP Majha
नागपूरसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये बहुतांश शाळेतील विद्यार्थी स्कूल बसने शाळेला जातात. त्यासाठी शाळा वर्षाकाठी हजारो रुपये फी वसूल करतात. मात्र, स्कूल बस सेवा कंत्राटी पद्धतीने एखाद्या ट्रान्सपोर्टरकडे सोपवतात. स्कूल बसच्या सेवेत काहीही गैर घडल्यास शाळा व्यवस्थापन ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टरकडे बोट दाखवून मोकळं होतं.
संबंधित बातम्या :
यशोमती ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य; निरुपम यांची टीका, तर सोमय्यांची तक्रार
Jalna ZP Election | जालना जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता | जालना | ABP Majhaअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement