(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तिच्या वडिलांनाही अश्लील शिवीगाळ
17 वर्षीय मुलीची 23 वर्षीय युवकासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत मुलाने मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि सोशल मीडियावरही बदनामी केली. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
नागपूरः ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्याचा देखावा करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सावनेर शहरात घडली आहे. याचा जाब विचारणाऱ्या वडिलांनाही आरोपीने अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याने सोशल मीडियावरही मुलीची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकल्याचे समोर आले आहे. राजा फुले आरोपीचे नाव असून तो वॉर्ड क्रमांक 4, श्री साईनगर, गुजरखेडी, सावनेर येथील रहिवासी आहे. त्याची 17 वर्षीय मुलीसोबत ओळख झाली होती. त्याने तिच्याशी 2019 मध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. तिला 15 ऑगस्ट 202 रोजी दुपारी 12च्या सुमारास स्वतःच्या घरी बोलवून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्याने जबरदस्तीने तिच्या गळ्यात हार टाकून सोबत फोटोही काढले होते.
नंतर बदनामी करण्याची धमकी देत दोनदा त्याच्या घरी बोलवून तिच्यावर अतिप्रसंगही केला. नुकतेच आरोपीकडून मुलीचे हार टाकलेले फोटो व अश्लील मॅशेज सोशल मीडियावर व्हायरल करुन तिची बदनामी केली. शिवाय तिच्या वडिलांना अश्लील शिवीगाळही आरोपीने केले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि 376 (2) (जे), 376 (2) (एन), 376 (3), 354 (9), 354 (डी), 500, 504, 506, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 सहकलम 4,5 (एल), बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरक्षक गेडाम करीत आहे.
या मानसिकतेचा विरोध करावाः पोलिसांचे आवाहन
अशा प्रकारच्या घटना घडल्यास मुलींनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रार दाखल करावी. योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या मानसिकतेची तक्रार करुन आरोपींना धडा शिकविल्यास अशा घटना समाजात घडणार नाही. त्यामुळे कुठलीही भिती मुलींनी बाळगू नये असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या