Nagpur Leopard News: बिबट्याला पकडण्यासाठी जीवाची बाजी; रेस्क्यू टीमसमोर अडचणींचा डोंगर, गाड्या बंद, तीन गनपैकी दोन नादुरुस्त
Nagpur Leaoperd News: रेस्क्यू टीमची रेस्क्यूसाठीची खास व्हॅन बंद पडली. त्यामुळे आधी बिबटला दुसऱ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून ट्रीटमेंट सेंटरकडे रवाना करावे लागले. त्यानंतर रेस्क्यू टीमला बंद पडलेल्या व्हॅनला धक्का मारत न्यावे लागले.

नागपूर: नागपुरातील शिवनगर परिसरात शिरलेल्या आणि अनेकांना जखमी करणाऱ्या आक्रमक बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू (leopard Rescue team) टीमने शर्थीचे प्रयत्न करून शिताफीने पकडलं. मात्र बिबट्याला पकडताना वन विभागाच्या पथकाची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आलं. बिबट्यासारख्या आक्रमक (leopard Rescue team) प्राण्याला पकडण्यासाठी आवश्यक सुरक्षा यंत्र आणि साधनांची वनविभागाच्या टीमकडे कमतरता दिसून आली. त्यामुळेच पोलिसांच्या हातातली सुरक्षा ढाल (सिक्युरिटी शिल्ड) तसेच लोकांच्या घरावर ठेवलेल्या बांबू आणि बल्ल्यांनी रेस्क्यू टीमने बिबट्याला जेरबंद केले. पिंजऱ्यात कैद केलेल्या बिबट्याला ट्रीटमेंट सेंटरला घेऊन जाताना ही रेस्क्यू टीमच्या अडचणी संपल्या नाही. कारण घटनास्थळापासून काही अंतरावर रेस्क्यू टीमची रेस्क्यूसाठीची खास व्हॅन बंद पडली. त्यामुळे आधी बिबटला दुसऱ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून ट्रीटमेंट सेंटरकडे रवाना करावे लागले. त्यानंतर रेस्क्यू टीमला बंद पडलेल्या व्हॅनला धक्का मारत न्यावे लागले. एबीपी माझाने या मागचे कारण शोधण्याचे प्रयत्न केले, तेव्हा आणखी धक्कादायक सत्य समोर आले.(leopard Rescue team)
Nagpur Leopard News: वन विभागाच्या अनेक गाड्या बंद, तीन गनपैकी दोन नादुरुस्त
* नागपूरच्या ट्रान्झीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये रेस्क्यू करून आणलेल्या वन्य प्राण्यांवर उपचार केले जाते.
* वन्य प्राण्यांना रेस्क्यू करण्यासाठी तिथूनच वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना होते.
* रेस्क्यू टीमला ज्या वन्य प्राण्याला रेस्क्यू करायचे आहे, त्या वन्यप्राण्यासाठी आवश्यक सुविधा असलेल्या खास वाहनातून रवाना होणे अपेक्षित असते.
* मात्र नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये बहुतांशी रेस्क्यूसाठीची वाहनं विविध कारणांनी नादुरुस्त आहे किंवा वापरण्याजोगे राहिलेले नाही.
* महाराष्ट्र सरकारने दिलेली सर्वात मोठी व्हॅन गेले अनेक महिने नादुरुस्त आहे आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे.
* एका खाजगी कंपनीकडून सीएसआरमध्ये मिळालेली वन्य प्राण्यांसाठीची अद्ययावत वैद्यकीय सोयींनीयुक्त वातानुकूलित ॲम्बुलन्स ही त्याचे एसी नादुरुस्त झाल्यामुळे वापरण्याजोगी राहिलेली नाही.
* तर भाजप आमदार प्रवीण दटके यांच्या निधीतून मिळालेली रेस्क्यू व्हेन ही ब्रेक खराब झाल्यामुळे चाक जाम होऊन गेले अनेक दिवस नादुरुस्त आहे.
* तर ज्या रेस्क्यू व्हॅनवरून सर्व काम सुरू होते, ती पण काल बिबट्याला नेताना क्लच प्लेट खराब झाल्यामुळे नादुरुस्त झाली.
* त्यामुळे आता एखाद्या ठिकाणी वन्य प्राण्याचा हल्ला झाला, तर वन्य प्राण्याला रेस्क्यू करण्यासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये आवश्यक वाहन उपलब्ध नाही अशी दुर्दैवी परिस्थिती आहे.
* ट्रांक्यूलायझेशसाठीच्या खास तीन गनपैकी दोन नादुरुस्त आहे. फक्त एक ट्रांक्यूलायझेशन गनवर काम सुरू आहे.
* तसेच वन्य प्राण्यांना पकडण्यासाठीची जाळी, कॅच पोल, फायबर रॉड, पिंजरा आणि पकडलेल्या प्राण्याला झाकण्यासाठीचे कव्हर या आवश्यक सुरक्षा साहित्यची ही कमतरता रेस्क्यू टीमला सहन करावी लागत आहे. त्यामुळे एखाद्या घटनास्थळी वन्यप्राण्याला रेस्क्यू करायला गेलेल्या रेस्क्यू टीमला आपला जीव मुठीत धरून वन्यप्राण्याला जेरबंद करावे लागत आहे आणि सुरक्षा उपायांशिवाय काम करावे लागत असल्यामुळे ते सामान्य जनतेच्या टीकेचे धनी ही ठरत आहे.























