Raj Thackeray : 'शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, जाती-जातीत विषही कालवलं'; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Raj Thackeray on Sharad Pawar : महाराष्ट्रात जातीचं राजकारण हे शरद पवारांनी सुरू केलं. 1993 ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.
नागपूर : महाराष्ट्रात जातीचं राजकारण हे शरद पवारांनी (Sharad Pawar) सुरू केलं. 1993 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. राज ठाकरे हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तयारीसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका
ते पुढे म्हणाले की, लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं. लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत योग्य उत्तर देणार हे नक्की, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप
शरद पवार यांच्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरू केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत त्यांनी विष कालवलं. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray: लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, 'लाडकी बहीण योजने'बाबतही राज ठाकरेचं मोठं विधान