'शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजतायत..', संजय शिरसाटांची तिरकस टोलेबाजी, भाजपलाही सुनावले, म्हणाले...
sanjay shirsat on sharad pawar: बदलापूरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले. यावरून शिरसाटांनी पवारांवर तिरकस टोलेबाजी केली.
Chhatrapati Sambhajinagar: 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजत आहेत. लोकांनादेखील वाटतं पावसात भिजल्याने निवडून येता येतं . आम्हाला देखील शॉवर लावून निवडणूकीत भाषणं करावी लागतील' असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरु असल्याचे सांगत शरद पवारांसह शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली आहे. बदलापूरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पुण्यात पावसाला सुरुवात झाली. पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यांसह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्त्यानी भरपावसात आंदोलन केल्यानंतर स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरु असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बदलापूर अत्याचार घटनेच्या विरोधात केलेल्या आंदोलनावरून शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवरही तिरकस टोलेबाजी केली.
काय म्हणाले शिससाट?
बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या मविआच्या आंदोलनावर आमदार संजय शिरसाट म्हणाले, "स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आपापल्या पक्षाचा अस्तीत्व दाखवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे शरद पवार पुण्यात, उद्धव ठाकरे मुंबईत, आणि नाना पटोले ठाण्यात आपापल्या कार्यकर्त्यांसोबत बसले आहे. जे सरकारच्या हातात आहे ती सर्व कारवाई केली आहे. सरकार कुणाचं आहे ते न पाहता सरकारला सूचना दिल्या असत्या तर समाजात एक msg गेला असता. काही लोकांना वेगळं काहीतरी करण्याची खाज आहे. आज त्यांच्या नाटकाचा भाग त्यांनी दाखवला. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी हे जे काही प्रतिकात्मक आंदोलन केले ती करायची गरज नव्हत, फाशी देण्याची जबाबदारी सरकारची कॉन्टॅर करण्यासाठी हे आंदोलन केले जात असतील तर त्या पक्षाच्या नेत्यांनी पाहावं." असे आमदार संजय शिरसाट म्हणाले.
शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजतायत...
शरद पवार आजकाल पाऊसात जास्तच भिजत आहे. लोकांना देखील वाटत पावसात भिजल्याने निवडून येतो. आम्ही देखील शावर लावू निवडणुकीत भाषण करावी लागतील. अशी तिरकस टीका शिरसाट यांनी केली. भाजपकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावरूनही शिरसाट यांनी भाजपला थेट टोला लगावलाय. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी हे जे काही प्रतिकात्मक आंदोलन केले ती करायची गरज नव्हत, फाशी देण्याची जबाबदारी सरकारची कॉन्टॅर करण्यासाठी हे आंदोलन केले जात असतील तर त्या पक्षाच्या नेत्यांनी पाहावं असं म्हणतउ'कायदा गेला उडत या वक्तव्यावर मी ठाम आहे....' असे शिरसाट म्हणाले. आंदोलन फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे. असेही ते म्हणाले.